Vodafone Idea share price : व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये अचानक तेजी, काय आहे कारण?

व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
Vodafone Idea share price Hike reasons
Vodafone Idea share price Hike reasonssakal

Vodafone Idea Share Price Hike: शेअर बाजार सोमवारी घसरणीसह बंद झाला, पण त्याच वेळी व्होडाफोन आयडियाच्या गुंतवणूकदारांची चांदी झाली. सुरुवातीच्या व्यवहारात व्होडाफोन आयडियाचा शेअर 24.38 टक्क्यांनी वाढून 8.57 रुपयांवर पोहोचला.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी तो 6.89 रुपयांवर बंद झाला होता. ट्रेडिंग सत्रादरम्यान तो कमाल 8.57 रुपये आणि किमान 7.57 रुपयांवर गेला. सोमवारी व्होडाफोन आयडियाचे शेअर्स 19.88 टक्क्यांनी अर्थात 1.37 रुपयांनी वाढत 8.26 रुपयांवर बंद झाला.

बीएसईवर कंपनीचे मार्केट कॅप आता 26,530.17 कोटी रुपये झाले. व्होडाफोन आयडियाच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 11.81 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 6.33 रुपये आहे. (Vodafone Idea share price increase suddenly read reason )

Vodafone Idea share price Hike reasons
Savings Idea : वयाची तिशी गाठण्याआधीच अशी सुरू करा पैशांची बचत

सरकारने व्होडाफोन आयडियाचे थकित व्याज इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या बातमीनंतर व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.

सरकारच्या या निर्णयामुळे कंपनीला मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे व्होडाफोन आयडियाचे काही कर्ज तात्काळ रिफायनांस केले जातील.

या पैशातून कंपनी विक्रेत्यांची थकबाकी भरू शकणार आहे. यासोबतच कंपनीला भांडवली खर्चासाठीही निधी मिळणार आहे. सरकार वीआयच्या (Vi) डिफर्ड एजीआरवरील 16,133.18 कोटी व्याज रुपये 10 प्रति शेअर दराने इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याची परवानगी दिली आहे.

व्होडाफोन आयडियाच्या प्रमोटर्सने आश्वासन दिले आहे की ते कंपनीसाठी कमिटेड असतील आणि आवश्यक फंड्स आणतील, त्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Vodafone Idea share price Hike reasons
Vodafone: व्होडाफोन पुन्हा डाऊन; ग्राहक त्रस्त

सप्टेंबर 2022 अखेर व्होडाफोन आयडियाचे ट्रेड पेएबल्स 15,030 कोटी रुपये होते. वीआयला लवकरच इंडस टॉवर्ससारख्या वेंडर्सची थकबाकी भरावी लागेल. तसेच, कंपनीला त्यांचे 4G नेटवर्क वाढवणे आवश्यक आहे. कंपनीला एरिक्सन आणि नोकिया सारख्या कंपन्यांसोबत 5G गिअर सप्लाय काँन्ट्रॅक्टला अंतिम रुप द्यायचे आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com