टाटा समूहाची, व्होल्टास लि. उभारणार दक्षिण भारतात नवा प्रकल्प

voltas
voltas

व्होल्टास लि. ही टाटा समूहाची उपकंपनी दक्षिण भारतात विस्तार करणार आहे. व्होल्टास लि. दक्षिण भारतात एक नवा उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. व्होल्टास लि. ही एअर कंडिनर उत्पादनाच्या व्यवसायातील आघाडीची कंपनी आहे. व्होल्टासच्या विस्ताराबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे. व्होल्टास लि.चे गुजरातमधील वाघोडिया, उत्तराखंडात पंतनंतर आणि गुजरातमध्येच साणंद येथे उत्पादन प्रकल्प आहेत. त्यानंतर आता कंपनी दक्षिण भारतात आपला उत्पादन प्रकल्प उभारते आहे. आगामी काळात भारतातच केलेल्या उत्पादनांची भूमिका मोठी असेल असे कंपनीला वाटते आहे.

'आपला देश स्वयंनिर्भर बनतो आहे आणि आम्ही आपली उत्पादन क्षमता वाढवत आहोत. उत्तर आणि पश्चिम भारतात ज्याप्रमाणे आमचे उत्पादन प्रकल्प आहेत त्याप्रमाणेच दक्षिण भारतातदेखील आमचा उत्पादन प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे', असे मत व्होल्टासचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बक्क्षी यांनी व्यक्त केले आहे.

एअर कंडिनर व्यवसायासाठी आणि व्यावसायिक रेफ्रिजरेशन व्यवसायासाठी कंपनी दक्षिण भारतात एक नवा उत्पादन प्रकल्प सुरू इच्छिते. आम्ही सर्व शक्यतांची पडताळणी करत आहोत. ग्राहकांच्या जास्तीत जास्त जवळ राहून त्यांना उत्तम सेवा आणि उत्पादने पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते बक्क्षी म्हणाले.

लॉकडाऊनच्या काळात कन्झ्युमर डुरेबलच्या व्यवसायाला फटका बसला आहे. व्होल्टासचे देशभरात 260 शोरुम आहेत. कंपनी हॉस्पिटल आणि औषध निर्माण कंपन्यांनादेखील पायाभूत सुविधा पुरवते. तर आंतरराष्टीय आघाडीवर मध्यपूर्व आणि सिंगापूर येथील कंपनीचे कामकाज लॉकडाऊनच्या काळातदेखील सुरूच होते. मागील महिन्यात कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले होते. मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत व्होल्टासच्या नफ्यात 12.52 टक्के वाढ होत कंपनीचा नफा 159.50 कोटी रुपयांवर पोचला आहे. तर कंपनीचे उत्पन्न 1.41 टक्क्यांनी वाढून 2,150.09 कोटी रुपयांवर पोचले आहे. 

कोरोनाच्या संकटकाळात व्होल्टासच्या ऑनलाईन विक्रीत वाढ झाली आहे. कोविड-19 नंतरच्या काळातसुद्धा ऑनलाईनवर भर देण्याचा कंपनीचा विचार आहे. व्होल्टास बेको हा टाटा समूह आणि टर्किश कंपनी आर्सेलिक यांचा संयुक्त उपक्रम आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com