म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका

म्युच्युअल फंड योजना किंवा इतर कोणत्याही गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करताना काही बाबींचे भान ठेवणे आवश्यक असते.फक्त गुंतवणूक प्रकार निवडून आणि त्यात गुंतवणूक करून संपत्ती निर्माण होत नाही.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका

म्युच्युअल फंड योजना हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. दिवसेंदिवस म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. नियमित गुंतवणूक करणे हे संपत्ती निर्मितीसाठी आवश्यकच आहे. मात्र म्युच्युअल फंड योजना किंवा इतर कोणत्याही गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करताना काही बाबींचे भान ठेवणे आवश्यक असते. फक्त गुंतवणूक प्रकार निवडून आणि त्यात गुंतवणूक करून संपत्ती निर्माण होत नाही. गुंतवणूकीची अंमलबजावणी करताना काही चूका टाळणे अत्यावश्यक असते. अन्यथा त्याचा परिणाम आपल्याला होणाऱ्या लाभावर किंवा परताव्यावर होणार असतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वॉरेन बफे किंवा राकेश झुनझुनवालासारखे प्रसिद्ध गुंतवणूकदारदेखील गुंतवणूक करताना काय करायचे, याच्याइतकेच महत्त्व गुंतवणूक करताना काय करू नये याला देत असतात. हे सूत्र अंमलात आणल्यास गुंतवणूकदाराला त्याचा नक्कीच फायदा होतो. याच सूत्राला पुढे नेत म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे हे पाहूया,

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

१. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना जर गुंतवणुकीचा कालावधी पाच वर्षांपेक्षा कमी असेल तर इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू नये. कारण इक्विटी प्रकारात अस्थिरता आणि जोखीम अधिक असते. इक्विटी प्रक्रारात दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरते.

२. सेक्टोरेल, थेमॅटिक फंड यामध्ये सुरूवातीच्या टप्प्यात गुंतवणूक करू नये. कारण यात जोखीम ही अधिक असते. त्यामुळे म्युच्युअल फंडाच्या इतर योजनांमध्ये गुंतवणूक करून झाल्यानंतरच आपली जोखीम क्षमता लक्षात घेऊन सेक्टोरेल, थेमॅटिक फंडामध्ये गुंतवणूक करणे योग्य.

३. डेट फंड आणि इक्विटी फंडाचा योग्य तो समतोल आपल्या पोर्टफोलिओमध्ये करावा. फक्त इक्विटी फंडातच गुंतवणूक केल्यामुळे आपल्या गुंतवणूकीतील जोखीम वाढते.

Lockdown : भारतात प्रत्येक राज्यात घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले

४. आर्थिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एसआयपीद्वारे गुंतवणूक करावी.

५. अगदी छोट्या कालावधीसाठी गुंतवणूक करताना डेट किंवा इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंड योजना टाळाव्यात. यासाठी ओव्हरनाईट फंड किंवा लिक्विड फंडासारखे पर्याय निवडावेत.

६. बाजारातील चढउतारांना अस्वस्थ किंवा चिंताग्रस्त होऊन वेळेआधीच घाईघाईने गुंतवणूक काढून घेऊ नका.

७. विविध माध्यमातून मिळालेल्या अपुऱ्या माहितीच्या जोरावर स्वत:च म्युच्युअल फंड योजना निवडून गुंतवणूक करण्याऐवजी नेहमीच आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखालीच गुंतवणूक करा.

Web Title: Vijay Tawde Writes Things Be Avoided While Investing Mutual Funds

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mutual Fund
go to top