
इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे? ही सरकारी बँक देतेय स्वस्तात कर्ज
तुम्हाला इलेक्ट्रिक कार (Electric Car) घ्यायची आहे का? तर तुम्ही ही बातमी वाचा. कारण देशातील सर्वात मोठी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) स्वस्त दरात ई-कार खरेदी करण्यासाठी कर्ज देत आहे. सरकार ई-कारांच्या विक्रीलाही प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होईल शिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवर अवलंबून राहणे कमी होणार आहे.
एसबीआयने ग्राहकांना ग्रीन कार लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला SBI ने याबाबत ट्विट करुन माहिती दिली. ग्रीन कार योजनेंतर्गत 7.25 ते 7.60 टक्के व्याजदर मिळणार आहे. ही योजना 15 मेपासून सुरू झाली आहे. (Want to buy an electric car? This is a cheap loan offered by SBI)
हेही वाचा: 2022 Kwid Vs Alto : किंमत अन् फीचर्समध्ये कोण आहे दमदार? वाचा डिटेल्स
ग्राहक या योजनेंतर्गत कर्ज घेऊ शकतात आणि ते 3 ते 8 वर्षांत परत करू शकतात. 21 ते 67 वयोगटातील कोणतीही व्यक्ती या कर्जासाठी अर्ज करू शकते. देशातील सर्वात मोठ्या बँकेने ग्राहकांसाठी वेगवेगळ्या कॅटेगरी ठरवल्या आहेत.
पहिल्या कॅटेगरीत पीएसयूचे कर्मचारी, डिफेंस कर्मचारी, पॅरा मिलिटरी, इंडिया कॉस्ट गार्डचे लोक येतात. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किमान उत्पन्न 3 लाख रुपये असण्याची अट ठेवण्यात आली आहे. SBI निव्वळ मासिक पगाराच्या 48 पट कर्ज देऊ शकते.
हेही वाचा: नव्या रुपात येतेय Maruti Suzuki Alto; जाणून घ्या फीचर्स
दुसऱ्या कॅटेगरीत व्यावसायिक (Proffessionals), स्वयंरोजगार (Self Employeed), व्यावसायिक (Businessmen), जे आयकर रिटर्न भरतात. त्यांच्यासाठीही वार्षिक 3 लाख रुपये उत्पन्नाची अट ठेवण्यात आली आहे. त्यांना एकूण करपात्र उत्पन्नाच्या 4 पट कर्ज म्हणून दिले जाऊ शकते
तिसरी कॅटेगरी शेती किंवा या कामांशी संबंधित आहेत. अशा लोकांचे वार्षिक उत्पन्न किमान 4 लाख रुपये असावे. त्यांना कर्ज रक्कम निव्वळ वार्षिक उत्पन्नाच्या 3 पट असू शकते.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Want To Buy An Electric Car This Is A Cheap Loan Offered By Sbi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..