46,800 रुपये Income Tax वाचविण्यासाठी शेवटचे ३ दिवस, ३१ मार्चपूर्वी करा हे काम

Income Tax
Income Tax

३१ मार्चपासून गुंतवणूकीचे काही पाऊल उचलून तुम्ही टॅक्स डिडक्टशनमध्ये सवलत मिळवू शकता. तसेच Belated किंवा Revised ITR फाईल करण्यासाठी हीच शेवटची तारीख आहे, ज्यांतर्गत तुम्ही तुमच्या गुंतवणूकीमधून टॅक्सेबल रक्कम वजा होते. आयकर कायद्याचे कलम 80C यासाठी ओळखले जाते.

सेक्शन 80C अतंर्गत तुम्ही 1.50 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर 46,800 रुपयांपर्यंत टॅक्स वाचवू शकता. म्हणजेच तुम्ही आपल्या 1.50 लाखपर्यंत गुंतवणूक केली असेल तर 80C अंतर्गत क्लेम करू शकता. 30 टक्के ब्रॅकेटमध्ये येणारा करदाता त्याच्या 80C गुंतवणुकीद्वारे 4 टक्के सेससह 46,800 रुपयांपर्यंत बचत करू शकतो.

Income Tax
ITR Filing ते KYC Updates! 31 मार्चपूर्वी उरकून घ्या ही कामे; नाहीतर...

पण यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे, चला जाणून घेऊया-

  • कलम 80C अंतर्गत तुम्ही रुपये 1.50 लाखपर्यंतच्या गुंतवणुकीवर किंवा खर्चावर रुपये 46,800 पर्यंत बचत करू शकता. यासाठी तुम्हाला या कलमांतर्गत येणाऱ्या गुतवणूकींमध्येच गुंतवणूक करावी लागेल.- हे महत्त्वाचे आहे की, तुमची गुंतवणूक 31 मार्चपूर्वी केली असेल, तर तुम्ही सवलतीसाठी पात्र असाल.

  • 80C अंतर्गत EPF (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी), PPF (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी), ELSS (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम), NSC (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र), NPS (नॅशनल पेन्शन सिस्टम), SCSS (वरिष्ठ नागरिक बचत) सुकन्या समृद्धि योजना आणि पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांच्या ट्रक्स सेविंग फिक्स्ड डिपॉजिट साराख्या गुंतवणूकीच्या माध्यमातून पैसे गुंतवू शकते आणि या गुंतवणूकीवर सुट मिळवू शकता.

Income Tax
Aadhaar-PAN Linking न केल्यास पडेल १० हजारांचा दंड! मुदत संपतेय
  • एक मोठी अट अशी आहे की जर तुम्ही जुन्या कर स्लॅबवर ITR भरत असाल तरच तुम्हाला ही सूट मिळेल. या सवलती नवीन स्लॅब प्रणाली अंतर्गत उपलब्ध नाहीत.

  • जेव्हा तुम्ही कलम 80C द्वारे 1.50 लाखांपर्यंत गुंतवणूक करता, त्यामुळे ही रक्कम तुमच्या एकूण उत्पन्नातून वजा केली जाते, अशावेळी तुमचे करपात्र उत्पन्नही कमी होते, तर तुम्हाला जेवढा कर भरावा लागणार आहे ती रक्कमही कमी होते, त्यामुळे 30 टक्के ब्रॅकेटसह करदात्याला 4 टक्के उपकरासह 46,800 रुपयांपर्यंतची बचत करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com