Aadhaar-PAN Linking न केल्यास पडेल १० हजारांचा दंड! मुदत संपतेय

प्राप्तिकर विभागाने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ असल्याचे सांगितले आहे.
Aadhaar pan linking
Aadhaar pan linking

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (PAN card-Aadhaar Linking) करण्याचा शेवटचा दिवस जवळ आला आहे. सरकारने या आधी अनेकदा ही मुदत वाढवली आहे. त्यामुळे हे काम अजून पूर्ण केले नसेल तर लवकरात लवकर लिंकिंग पूर्ण करा. प्राप्तिकर विभागाने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ निश्चित केली आहे. त्यामुळे उद्यापर्यंत पॅन आणि आधार लिंक करून घ्या. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) नुसार, तुम्ही ३१ मार्च २०२२ पर्यंत तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करू शकता. २०१७ साली मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचे PAN आधारशी जोडावा लागेल, घोषणा केली होती.

Aadhaar pan linking
Income Tax Return: इन्कम टॅक्स भरण्याइतका पगार नाहीये! तरीही भरा कर

३१ मार्चपर्यंत लिंक न झाल्यास दंड

पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ ही आहे. अशावेळी जर तुम्ही आधार पॅनशी लिंक केले नसेल तर लवकर करा. मुदतीपूर्वी जर तुम्ही पॅन आधारशी लिक केले नाही तर तुम्हाला १० हजारापर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे दंड वाचविण्यासाठी लवकर हे काम करून घ्या.

Aadhaar pan linking
बायकोच्या नावाने उघडा Special Account! महिन्याला मिळतील ४५ हजार
Aadhar Card
Aadhar Card

अशाप्रकारे बघू शकता आधार पॅन लिंक स्टेटस

-सगळ्यात आधी इन्कम टॅक्सची अधिकृत वेबसाईट incometax.gov वर जा

-तिथे तुम्हाला 'Link Base' स्टेटसचा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा.

-त्यानंतर पुढचे पेज उघडेल. तिथे तुम्हाला तुमचा आधार आणि पॅन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर लिंक स्टेटसवर क्लिक करा.

- क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर आधार पॅन लिंक आहे का नाही ते दिसेल.

Aadhaar pan linking
१ एप्रिलपासून महागणार 'या' गोष्टी

आधार पॅन असे करा ऑनलाईन लिंक

- सगळ्यात आधी इन्कम टॅक्सची अधिकृत वेबसाईट incometax.gov वर जा

- तिथे तुम्हाला 'Link Base' स्टेटसचा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा. त्यानंतर एक नवे पेज उघडेल.

- तिथे तुम्हाला आधार कार्डमध्ये पॅन नंबर, आधार नंबर आणि नाव दिसेल. या लिंकवर क्लिक करा.

- त्यानंतर प्राप्तिकर विभागाकडून तुमची लिंक प्रोसस सुरू होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com