दोन अंबानी बंधू; पाहा कोणाची किती आहे संपत्ती!

टीम ईसकाळ
Friday, 20 December 2019

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारभांडवल 10.17 लाख कोटी रुपये या नवीन उच्चांकी पातळीवर पोचले आहे. कंपनीच्या शेअरने गुरुवारी पहिल्यांदाच 1600 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. दिवसअखेर शेअर 29.45 वधारून 1605 रुपयांवर स्थिरावला. कंपनीने वर्ष 2014-19 दरम्यान देशात सर्वाधिक संपत्ती निर्माण केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालमत्तेत या कालावधीत 5.6 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. तसेच देशातील आघाडीच्या 100 कंपन्यांनी याच कालावधीत मालमत्तेत सुमारे 49 लाख कोटी रुपयांची भर घातली आहे. 

मोतीलाल ओसवाल वार्षिक संपत्ती निर्मिती अहवाल 2019 मध्ये याबाबतचे विश्‍लेषण करण्यात आले आहे. सात वर्षांनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक संपत्ती निर्माण करणारी कंपनी ठरली आहे. बजाज फायनान्सचाही वेगवान संपत्ती निर्मिती करणारी कंपनी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या अहवालानुसार वित्तीय क्षेत्र हे या कालावधीत भारतातील सर्वाधिक संपत्ती निर्माण करणारे क्षेत्र ठरले आहे. आघाडीच्या 100 कंपन्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील फक्त नऊ कंपन्यांचा समावेश आहे. 

अनिल अंबानींच्या संपत्तीत घट 
अनिल अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या सहा महिन्यांत 73.33 टक्‍क्‍यांनी घसरण झाली आहे. ती आता 970 कोटी रुपयांवर पोचली आहे. ती जून रोजी 3 हजार 651 कोटी रुपये होती. वर्ष 2008 मध्ये अनिल अंबानी अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती होते. अनिल अंबानींच्या कंपन्यांचे एकूण बाजारभांडवल सहा महिन्यांपूर्वी सुमारे 7 हजार 500 कोटी रुपये होते. ते 2 हजार 400 कोटी रुपयांवर पोचले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wealth gap between Ambani brothers

टॉपिकस