'पर्सनल वेल्थ मॅनेजमेंट' ही श्रीमंतांचीच नाही तर सर्वसामान्यांचीसुद्धा गरज(व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पुणे: एडलवाईज पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरीच्या कामगिरी आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवेसंदर्भात एडेलवाईस पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरीचे प्रमुख राहुल जैन यांनी संवाद साधला. त्यावेळेस सकाळला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरी किंवा वैयक्तिक संपत्ती व्यवस्थापन ही आता काळाची गरज झाली असून प्रत्येक सर्वसामान्य गुंतवणूकदाराने त्याचा लाभ घेतला पाहिजे. फक्त श्रीमंतांनीच संपत्तीचे व्यवस्थापन करायचे नसते तर छोट्या स्वरुपात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच आपल्या गुंतवणूकीचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

पुणे: एडलवाईज पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरीच्या कामगिरी आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवेसंदर्भात एडेलवाईस पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरीचे प्रमुख राहुल जैन यांनी संवाद साधला. त्यावेळेस सकाळला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. पर्सनल वेल्थ अॅडव्हायझरी किंवा वैयक्तिक संपत्ती व्यवस्थापन ही आता काळाची गरज झाली असून प्रत्येक सर्वसामान्य गुंतवणूकदाराने त्याचा लाभ घेतला पाहिजे. फक्त श्रीमंतांनीच संपत्तीचे व्यवस्थापन करायचे नसते तर छोट्या स्वरुपात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच आपल्या गुंतवणूकीचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. योग्य पोर्टफोलिओ तयार करणे गुंतवणूकीतील महत्त्वाची बाब आहे, असे मत यावेळी राहुल जैन यांनी मांडले. 

गुंतवणुकीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालल्याने वेबसाईट किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आता सहजतेने या सेवेचा लाभ घेता येणार आहे. गुंतवणूकदारांच्या गरजा, वयानुरुप वैयक्तिक संपत्ती व्यवस्थापन केले जाते. एडेलवाईसच्या या प्रकारच्या सेवा गुंतवणूकदारांपर्यत जास्तीत जास्त पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मोठ्या या सेवा फक्त मोठ्या शहरांपर्यतच मर्यादित न राहता छोट्या शहरातील आणि ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांपर्यतसुद्धा वैयक्तिक संपत्ती व्यवस्थापन उपलब्ध करून दिले जात आहे. तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष सल्लागाराने गुंतवणूकदारांपर्यत जाऊन संवाद साधण्याची आवश्यकता राहलेली नाही, असेही जैन पुढे म्हणाले. 

येत्या काही वर्षात भारतात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत जाणार असून देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटकांचा फारसा नकारात्मक परिणाम यावर होणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी योग्य गुंतवणूकीकडे वळले पाहिजे. फक्त एकाच गुंतवणूक प्रकारावर अवलंबून न राहता योग्य पद्धतीने वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकाराचा वापर करत चांगला पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी तयार करणे आवश्यक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wealth Management Is Not Just for the Rich