डिमॅट अकाऊंट म्हणजे काय? (व्हिडिओ)

सोमवार, 13 मे 2019

शेअर बाजारात बहुतांश लोकांना व्यवहार करायचा असतो.  मात्र बऱ्याच लोकांना तो कसा करावा लागतो? म्हणजे त्यासाठी आधी काय करावे लागते हे माहित नसते. त्यामुळे सगळ्यात आधी आपण डिमॅट अकाऊंट म्हणजे काय? हे माहित करून घेऊया. शेअर बाजारात जर व्यवहार करायचे असतील तर सुरुवातीची पायरी ही डीमॅट अकाऊंट हीच आहे. डीमॅट अकाऊंट म्हणजे असे अकाऊंट की ज्यात आपण शेअर, करन्सी आणि कमोडिटी सारखे व्यवहार करू शकतो.  डीमॅट अकाऊंट असल्याशिवाय शेअर बाजारात किंवा करन्सी आणि कमोडिटी बाजारात व्यवहार करता येत नाहीत. 

डिमॅटसाठी वार्षिक मेंटेनन्स आणि केलेल्या व्यवहाराचे नाममात्र शुल्क (ब्रोकरेज, दलाली) आकारले जाते. पण एका ठराविक ब्रोकरला अडीच टक्क्यांपेक्षा अधिक ब्रोकरेज आकारता येत नाही.  डिमॅट खाते उघडल्यानंतर त्यात नियमित शेअर खरेदी विक्रीचे व्यवहार केलेच पाहिजे असे कोणतेही बंधन गुंतवणूकदारावर नसते. त्यामुळे आपण नेहमी व्यवहार न करता देखील डिमॅट अकाऊंट केवळ उघडून ठेवून दिले तरी काहीही फरक पडत नाही. 
 
ज्यांच्याकडे अजूनही जुने शेअर सर्टिफिकेट असतील त्यांनी ते शेअर डिमॅट फॉर्ममध्ये करून घेणे आवश्यक आहे. जिथे तुम्ही डीमॅट अकाऊंट उघडता तेथेच एक ‘डीआरएफ’ (Demat Request Form) भरून द्यावा लागतो आणि आपले शेअर सर्टीफिकेट द्यावे लागते. मग त्याचे डिमॅट फॉर्ममध्ये रूपांतर केले जाते. 

डिमॅट खात्यासाठी लागणारी कागदपत्रे
डिमॅट खाते सुरु करण्यासाठी केवायसीच्या नियमानुसार कागदपत्रे द्यावी लागतात. शेअरचे व्यवहार करणाऱ्या ब्रोकरशी करार करावा लागतो. सहसा पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते. 
-पॅन कार्ड
-बँक स्टेटमेंट
-रहिवासाचा पुरावा
-इनकम टॅक्स रिटर्न
-फोटो
-बँकेचा क्रॉस केलेला चेक
-केवायसी माहिती
-आधारकार्ड
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is a Demat Account