पाचशे आणि हजारांच्या नोटांचे काय करायचे?

पाचशे आणि हजारांच्या नोटांचे काय करायचे?
पाचशे आणि हजारांच्या नोटांचे काय करायचे?

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मध्यरात्रीपासून सध्या चलनात असलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद झाल्याची घोषणा केली. आता लवकरच 500 आणि 2000 च्या नव्या नोटा चलनात येणार आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटांचे काय करायचे याबाबत जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा.

1. आपल्याकडील नोटांच्या बदल्यात आपल्याला काय मिळणार?

आपल्या जवळील रकमेच्या नोटांच्या बदल्यात तेवढ्याच रकमेच्या दुसऱ्या नोटा बॅंक देणार आहे. मात्र बॅंकेकडून कॅश मिळण्यावर सध्या मर्यादा घालण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्याकडील पाचशे आणि हजाराच्या नोटा बॅंकेकडे देऊन आपल्या खात्यात तेवढीच रक्कम जमा करता येणार आहे.

2. बॅंकेकडून किती रक्कम मिळणार?

आपण बँकेत आपल्याकडील पाचशे आणि हजाराच्या कितीही नोटा भरल्या तरी प्रत्येकाला सध्या फक्त 4000 रुपयेच रोख स्वरुपात मिळणार आहे. बाकीचे आपले पैसे आपल्या खात्यात जमा करण्यात येतील.

3. चार हजारांपेक्षा आधिक रक्कमेचा व्यवहार करावयाचा असल्यास काय?

सध्या चार हजारांपेक्षा आधिक रक्कमेचा व्यवहार करावयाचा असल्यास चेक किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंट म्हणजे इंटरनेट बँकिंग, मोबाइल वॉलेट, आयएमपीएस्, क्रेडिट/ डेबिट कार्ड्सच्या माध्यमातून व्यवहार करावा लागणार आहे.

4. सध्या तुमचे बॅंक खाते नसेलच तर काय?

आवश्यक अशी कागदपत्रे घेऊन बँकेत घेल्यास बॅंक तुमचे नवीन खाते उघडून देणार आहे.

5. पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलण्यासाठी कुठे जावे?

आपण आपले बॅंक खाते असलेल्या बॅंकेत पैसे जमा करू शकणार आहोत. त्याशिवाय

रिझर्व्ह बँकेच्या 19 कार्यालयांमध्ये किंवा इयतर कोणत्याही बँकेच्या शाखेत आणि पोस्टात नोटा बदलून मिळणार आहेत.

6.नोटा बदलतेवेळी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?

आपल्या बँकेच्या किंवा इतर बँकेच्या कोणत्याही शाखेत तुम्ही ओळखपत्रासह म्हणजेच पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत सादर करून नोटा बदलू शकतो. एका दिवसात चार हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून मिळतील. त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास केवळ ज्या बँकेत तुमचे खाते आहे, त्या बँकेच्या कोणत्याही शाखेत तुम्हाला नोटा बदलून मिळणार आहेत.

7.एटीएममधून किती पैसे काढता येणार?

एटीएममधून 18 नोव्हेंबरपर्यंत एकावेळी फक्त दोन हजार रुपयेच काढता येणार आहे. आणि 19 नोव्हेंबरनंतर एटीएममधून 4000 रुपयांपर्यंत रक्कम काढू शकता. आठवडाभरात फक्त 20 हजार रुपये काढता येणार आहे.

8.चेकद्वारे रोकड काढता येईल का?

 चेकद्वारे पैसे काढता येणार आहे. मात्र त्याची मर्यादा जास्तीत जास्त दहा हजार आणि एका आठवड्यात एकूण मर्यादा वीस हजार जाहीर करण्यात आली आहे.

9.एटीएमच्या माध्यमातून आलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा पुन्हा जमा करता येणार का?

एटीएमच्या माध्यमातून जर पाचशे आणि हजाराच्या नोटा आल्या असतील तर त्याबॅंकेकडे पुन्हा कॅश डिपॉझिट मशीनचा वापर करुन भरता येणार आहे.

10. इंटरनेट बँकिंग/मोबाइल बँकिंग या सुविधांचा लाभ घेता येणार का?

इंटरनेट बँकिंग/मोबाइल बँकिंग या सुविधा नेहमीप्रमाणे कायम राहणार आहे.

11. नोटा बदलण्यासाठी कोणती ओळखपत्र वापरु शकता?

आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, एनआरइजीए कार्ड, पॅनकार्ड इत्यादी ओळखपत्र वापरून नोटा बदलता येणार आहेत. म्हणजेच बॅंकेत नोटा बदलताना पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.

पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलण्यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास आरबीआयच्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध होणार आहे.  www.rbi.org.in  या साईटवर नोटा बदलण्यासंबंधित आवश्यक माहिती मिळेल. शिवाय आरबीआयच्या  या आयडीवर आपले प्रश्न विचारू शकणार आहात. शिवाय 022-22602201/  022-22602944  या क्रमांकावर फोन करून प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com