शेअर मार्केटमध्ये लागलेल्या 'लोअर सर्किट'चा अर्थ काय?

प्रविण कुलकर्णी 
Monday, 16 March 2020

सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे 3200 आणि 900 अंशांपेक्षा जास्त घसरले. एकीकडे एवढी घसरण झालेली असताना देखील या निर्देशांकांना 'लोअर सर्किट' लागले नाही. याचनिमित्ताने 'लोअर सर्किट' म्हणजे काय आणि त्याचे नियम काय असतात हे थोडक्यात जाणून घेऊया.  

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला साथीचा रोग म्हणून जाहीर केल्यानंतर जागतिक शेअर बाजारासहित भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात आपटला. भारतातील प्रमुख निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीत ऐतिहासिक घसरण होत एकाच दिवसात झालेली सर्वात मोठी घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे 3200 आणि 900 अंशांपेक्षा जास्त घसरले. एकीकडे एवढी घसरण झालेली असताना देखील या निर्देशांकांना 'लोअर सर्किट' लागले नाही. याचनिमित्ताने 'लोअर सर्किट' म्हणजे काय आणि त्याचे नियम काय असतात हे थोडक्यात जाणून घेऊया.  

महाराष्ट्रात कोरोनाचे १४ रुग्ण; कर्नाटकात देशातील पहिला बळी

एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत नियंत्रित करण्यासाठी कंपनीची मिळकत, कंपनीची कामगिरी, आरबीआयकडून जाहीर होणारे व्याजदर, सरकारी धोरणे, आर्थिक निकाल, व्यवस्थापन धोरणे असे विविध घटक कारणीभूत असतात. मात्र बऱ्याच वेळा तात्कालिक परिस्थितीनुरूप गुंतवणूकदार किंवा सट्टेबाजांच्या लोभामुळे किंवा भीतीमुळे समभागांच्या किंमतींमध्ये तीव्र अस्थिरता निर्माण होते. या परिस्थतीत गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (एनएसई) एक यंत्रणा अंमलात आणली आहे त्याला सर्किट फिल्टर किना सर्किट ब्रेकर असेही म्हणतात.

सर्किट ब्रेकर म्हणजे काय?
एखाद्या शेअरची एका दिवसात होणारी हालचाल, तेजी किंवा घसरण मर्यदित ठेवण्यासाठी जे प्रमाण निश्चित केले आहे त्याला सर्किट ब्रेकर असे म्हणतात. म्हणजे तेजीला वेसण घालण्यासाठी 'अप्पर' सर्किट तर घसरणीला मर्यादित ठेवण्यासाठी 'लोअर' सर्किट.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सर्किट लिमिट फॉर स्टॉक एक्सचेंजेस
सर्वसाधारण शेअरप्रमाणेच सेन्सेक्स किंवा निफ्टी सारख्या निर्देशांकांना देखील सर्किट लिमिट असते. मात्र त्याचे प्रमाण आणि लिमिट कालावधी वेगळा असतो. निर्देशांकांना 10, 15 आणि 20 टक्के याप्रमाणे सर्किट लागते. म्हणजे एखाद्या दिवशी या निर्देशांकांमध्ये 10, 15 आणि 20 टक्क्यांच्या प्रमाणात तेजी किंवा घसरण झाली तर निर्देशांकाचे कामकाज विशिष्ट कालावधीसाठी थांबविले जाते. उदा.

10 टक्के : निर्देशांकात दुपारी  1 किंवा  1 ते  2.30 वाजेपर्यंत 10 टक्क्यांची तेजी किंवा घसरण झाल्यास 1 तासांसाठी कामकाज थांबविले जाते.

15 टक्के : निर्देशांकात दुपारी 1 वाजेपर्यंत 15 टक्क्यांची तेजी किंवा घसरण झाल्यास 2 तासांसाठी कामकाज थांबविले जाते.
                1 ते  2 वाजेपर्यंत तेजी किंवा घसरण झाल्यास  1 तासांसाठी कामकाज थांबविले जाते.
                2.30 नंतर तेजी किंवा घसरण झाल्यास दिवसभरासाठी कामकाज थांबविले जाते.
20 टक्के : निर्देशांकात 20 टक्क्यांची तेजी किंवा घसरण झाल्यास संपूर्ण दिवसभरासाठी कामकाज थांबविले जाते.

शेअरसाठी सर्किट लिमिट :
समजा एखाद्या शेअरची कामकाजाला सुरुवात करतानाची किंमत 100 रुपये असेल तर 10 टक्क्यानुसार 110 वर गेल्यास लिमिट लागते. मात्र त्या शेअर्समधील कामकाज तेथे न थांबता 15 टक्क्यांवर गेल्यास 110 वर 5 टक्के आकारून 115.5वर सर्किट लागेल. त्यानंतर सर्किट मोकळे झाल्यानंतर शेअर 20 टक्क्यांवर पोचल्यास 115.5 वर 5 टक्के आकारून 122 वर सर्किट लागून दिवसभरासाठी कामकाज थांबविण्यात येते.

या शेअरला सर्किट मर्यादा नसते
जे शेअर फ्युचर अँड ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये उपलब्ध असतात त्यांना सर्किट लागत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what is meant by Lower circuit in Share Market