Budget 2020 : काय महाग? काय स्वस्त?

वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

अर्थसंकल्पाचा वस्तू आणि सेवांवर काय परिणाम होणार? कोणत्या वस्तू स्वस्त होणार तर कोणत्या सेवा महागणार हे आपण थोडक्यात पाहूया...
 

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत विक्रमी वेळ भाषण करून अर्थसंकल्प सादर केला. हा सर्वसमावेशक व विकासाला पूरक अर्थसंकल्प असल्याचे सत्तारूढ खासदार व मंत्र्यांचे मत आहे, तर तब्बल पावणेतीन तासांचे लक्षवेधी वक्तृत्व, या पलीकडे अर्थसंकल्पात बेरोजगारी व मंदी यावरील उपायांबाबत काहीही नाही असा विरोधकांकडून आरोप करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थसंकल्पाचा वस्तू आणि सेवांवर काय परिणाम होणार? कोणत्या वस्तू स्वस्त होणार तर कोणत्या सेवा महागणार हे आपण थोडक्यात पाहूया...

महाग होणार

 • सोने
 • काजू
 • चांदी व चांदीचे दागिने
 • स्टेशनरी
 • ऑप्टिकल फायबर
 • सीसीटीव्ही कॅमेरे
 • वातानुकूलन यंत्रणा
 • मोबाईल फोन
 • विदेशी फर्निचर
 • सिगारेट
 • तंबाखू
 • लाउडस्पीकर
 • गाड्यांचे हॉर्न
 • आयात केलेली मेडिकल उपकरणे

स्वस्त होणार

 • इलेक्ट्रिक मोटारी
 • घरे
 • साबण
 • डिटर्जंट
 • शाम्पू
 • तेल
 • टूथपेस्ट
 • पंखे
 • दिवे
 • प्रवासी बॅगा
 • भांडी
 • चष्माच्या फ्रेम
 • गाद्या
 • बांबूचे फर्निचर
 • धूप
 • खोबरे
 • पास्ता
 • मेयोनीज
 • सॅनिटरी नॅपकिन

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What will be expensive; What will be cheaper after Budget 2020