esakal | महाराष्ट्र बँकेच्या खासगीकरणाने कोणाला फायदा! खातेधारकांचे काय होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

1BankOfMaharashtra

केंद्र सरकारतर्फे बँकिंग क्षेत्रातील सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याचे धोरण अवलंबिण्यात येत आहे. यातच आता बँक ऑफ महाराष्ट्राच्या खासगीकरणाचा घाट केंद्र सरकारतर्फे घातला जात आहे. तब्बल ८५ वर्षांहून अधिक काळ ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या या बँकेमुळे सर्वसामान्य ते शेतकऱ्यांना आधार दिला आहे.

महाराष्ट्र बँकेच्या खासगीकरणाने कोणाला फायदा! खातेधारकांचे काय होणार?

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : केंद्र सरकारतर्फे बँकिंग क्षेत्रातील सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याचे धोरण अवलंबिण्यात येत आहे. यातच आता बँक ऑफ महाराष्ट्राच्या खासगीकरणाचा घाट केंद्र सरकारतर्फे घातला जात आहे. तब्बल ८५ वर्षांहून अधिक काळ ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या या बँकेमुळे सर्वसामान्य ते शेतकऱ्यांना आधार दिला आहे. बँकेचे खासगीकरण झाल्यावर अनेक शाखा बंद होण्याची भीती आहे.

सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीही महागली

यात औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील तब्बल ७० शाखा बंद होतील. याच बँकेची उपबँक असलेली महाराष्ट्र ग्रामीण बँकही बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाच प्रकारे ग्रामीण भागातील सार्वजनिक बँकांची सेवा बंद होईल. सार्वजनिक बँका तोटा सहन करून सामाजिक दायित्वाने ग्रामीण भागात सेवा देत आहेत. त्याच तुलनेत खासगी बँका या केवळ पैसे कमाविण्याचे काम करतात. या बँकांचे खासगीकरण झाल्यावर सध्या निःस्वार्थपणे सेवा दिली जात आहे. ती बंद होणार आहे. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले जाते, हे होणार नाही. बँक ऑफ महाराष्ट्राने अनेक शेतकरी तसेच छोटे-छोटे व्यावसायिकांना उभे करीत स्वयंपूर्ण केले आहे.

SBI च्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी; FD चे व्याजदर केले कमी

सर्वसामान्यांचा आर्थिक विकासदर वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात या बँकेच्या ११०० शाखा आहेत तर मराठवाड्यात २०० शाखा आहेत. बँक खासगीकरण झाल्यावर यातील केवळ बोटावर मोजण्याइतक्याच शाखा राहतील आणि खासगी बँकांची मक्तेदारी वाढेल. परिणामी सर्वसामान्य बँकिंग सेवेपासून पुन्हा दुरावेल. यात मोठे नुकसान सर्वसामान्यांचे होणार आहे.


स्वदेशी चळवळीपासून या बँकेची मराठी माणसाने सुरवात केली. बँकेने सर्वस्तरांपर्यंत सेवा देत सर्वांचा विश्‍वास संपादन केला आहे. सर्वसामान्यांसाठी तोटा सहन करीत ही बँक नफ्यात आली आहे. आता खासगीकरण झाल्यावर सेवेमध्ये कमर्शियलपणा येईल. बँकेचे खासगीकरण झाल्यानंतर सर्व शाखा बंद होतील.
- देविदास तुळजापूरकर, सरचिटणीस, बँक ऑफ महाराष्ट्र व ऑल इंडिया फेडरेशन
 

संपादन - गणेश पिटेकर