पप्पूने देखील केले... तुम्ही केले का?

  why financial planning is necessary
why financial planning is necessary

पप्पू : 'हॅप्पी न्यु इयर' आणि 'गुड मॉर्निंग' !  
       
ओंकार : 'गुड मॉर्निंग' ! अरे वा ! 'न्यु इयर' ची सुरुवात 'मॉर्निंग वॉक' ने ... छान आहे !  
       
पप्पू : हो रे ... सततच्या कामात व्यस्त असल्यामुळे तब्येतीकडे लक्ष दिले गेले नाही वर्ष भर. म्हणून तू सांगितल्या प्रमाणे ह्या वर्षाची सुरुवात शारीरिक तंदुरुस्तीने केली आहे.  
     
ओंकार : 'व्हेरी गुड' पण नुसता सुरुवातीला नाही तर शेवट पर्यंत हाच निग्रह कायम ठेव.  
       
पप्पू : 'येस' 'प्लॅन' तर तोच आहे. तुझ्या सारखा मित्र बरोबर आहे म्हणूनच तर शिकलोय की 'हेल्थ इज वेल्थ'.  
       
ओंकार : हो पण, 'इज' म्हणजे '=' हे विसरू नये ... 'वेल्थ' सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. फक्त त्या पायी तब्येत बिघडू नये.  
       
पप्पू : अरे पैश्या मागे धावणं थांबवू शकत नाही … आणि आर्थिक अडचणींमुळे मानसिक ताण येतो.  
       
ओंकार : जसं आपण शारीरिक 'फिटनेस' साठी 'प्लॅन' करून व्यायाम करतो अगदी तसंच तू आर्थिक 'फिटनेस' साठी सुद्धा 'नीट 'प्लॅन' कर म्हणजे आर्थिक 'स्ट्रेस' होणार नाही.  
       
पप्पू : आर्थिक 'फिटनेस'चा 'प्लॅन' … ही काय भानगड आहे ?  
       
ओंकार : अरे भानगड काही नाही ... आर्थिक 'फिटनेस'चा 'प्लॅन' म्हणजे आपले आर्थिक नियोजन : 'फायनांशियल प्लँनिंग'.  
       
पप्पू : 'ओके', पण हे 'फायनांशियल प्लँनिंग' कुणी करावे ?  
       
ओंकार : साध्या भाषेत 'फायनांशियल प्लँनिंग' म्हणजे आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या पैश्याचे नियोजन. हे तसे फार काही अवघड नाही. आपण स्वतः नक्कीच करू शकतो, पण एखादा चांगला 'फायनांशियल ऍडव्हायझर' असल्यास उत्तम.  
       
पप्पू : पण आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय करायचे ?  
       
ओंकार : आपली आर्थिक उद्दीष्ट्ये काय आहेत, आपल्याला विविध गरजांकरिता कधी, व भाव वाढीचा विचार करून, भविष्यात किती पैसे लागणार आहेत याचा हिशोब करून ते लिहून ठेवावे. आपल्याला कुठे जायचे आहे ते निश्चित झाल्या नंतरच तिथपर्यंत कसे जायचे हे बघता येते.  
     
पप्पू : 'ओके', म्हणजे आपल्या आर्थिक उद्दिष्टयांपर्यंत जाण्याचा 'रोड मॅप' !  
       
ओंकार : 'येस', शिवाय आपल्या आर्थिक उद्दिष्टयांपर्यंतच्या प्रवासात आपण किती धक्के पचवू शकतो हे तपासण्या करिता 'फायनांशियल प्लँनिंग' मधील 'रिस्क प्रोफाईलिंग' हा महत्त्वपूर्ण भाग आहे.  
         
पप्पू : म्हणजे आपल्यात 'रिस्क' घेण्याची 'कॅपॅसिटी' किती आहे ते कळते.  
       
ओंकार : हो, म्हणजे आपण आपल्या उद्दिष्टयांनुसार व आपल्या 'रिस्क प्रोफाइल'नुसार, वेगवेगळ्या 'ऍसेट क्लास' मध्ये गुंतवणूक करू शकतो. गुंतवणुकीत मुख्य ४ 'ऍसेट' 'क्लास' असतात : 'डेट', 'इक्विटी', सोनं आणि 'रिअल इस्टेट'. प्रत्येकाचे वेग-वेगळे 'प्लस' आणि 'मायनस पॉईंट्स' आहेत ... प्रत्येकाची 'रिस्क' व 'लिक्विडीटी' ( द्रवता ) ही कमी जास्त असते.  
      
पप्पू : आपल्या गुंतवणुकीतील उद्दिष्ट्यांनुसार हे प्रकार निवडले पाहिजेत. पण 'रिस्क' कशाला घ्यायची ?  
       
ओंकार : कारण आर्थिक विश्वात जेवढी 'रिस्क' जास्त तेवढे 'रिटर्न्स' जास्त. पण 'रिस्क' आणि 'रिटर्न्स'चे व्यवस्थापन हे नेहमीच योग्य प्रकारे केले पाहिजे. जे 'ऍसेट' 'अलोकेशन' द्वारे साध्य करता येते.  

पप्पू : ते कसे ?  
       
ओंकार : डेट' आणि 'इक्विटी' यात 'इन्व्हर्स रिलेशन असते. त्यामुळे जेव्हा 'इक्विटी मार्केट' खाली असते तेव्हा 'डेट मार्केट' वर असते. आणि त्याच प्रमाणे उलट. आर्थिक नियोजनामुळे कुठल्या 'ऍसेट' 'क्लास' मध्ये आपले किती 'एक्सपोझर' आहे ते कळते व योग्य 'अलोकेशन' करून विविधीकरण ही साध्य करता येते.  
  
पप्पू : 'ओके', पण आपल्याला या आर्थिक नियोजनातून, अजून कुठले धोके आहेत हे कळते का ?  
       
ओंकार : सामान्यतः आपल्या प्रत्येकाला ४ प्रमुख आर्थिक धोके असतात : मरण, आजारपण, अपंगत्व व आपत्ती. आपल्या आर्थिक गरजांना भेडसावणाऱ्या या सर्व धोक्यांसाठी आपण व्यापक व पर्याप्त असे, संपूर्ण सुरक्षा देणारे 'इन्शुरन्स' 'कव्हर' घेतले पाहिजे. ते किती असावे हे ओळखणे, आपल्याला 'फायनांशियल प्लँन' मुळे शक्य होते.  

पप्पू : अश्या संपूर्ण सुरक्षेसाठी नक्की काय केले पाहिजे ?  
       
ओंकार : 'टर्म इन्शुरन्स', 'हेल्थ इन्शुरन्स', 'पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स' आणि 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' या पॉलिसीज आपल्याला संपूर्ण सुरक्षा कवच प्रदान करतात.  

पप्पू : बरं, आणि अश्या आर्थिक नियोजनातून कुठली गुंतवणूक सर्वाधिक चांगली हे कळते का ?  
       
ओंकार : केवळ परतावा बघून कधीच गुंतवणूक करू नये. सर्वाधिक चांगली गुंतवणूक या पेक्षा सर्वात योग्य गुंतवणूक कुठली हे जास्त महत्त्वाचे. आर्थिक नियोजन म्हणजे आपल्या गुंतवणुकींची हेतू नुसार निवड करणे आणि त्यावर लक्ष ठेवून आपली आर्थिक वाटचाल योग्य दिशेने आणि योग्य गतीने चालली आहे का, हे पाहणे.  
  
पप्पू : म्हणजे 'फायनांशियल प्लँन' आपल्याला आपल्या सर्व आर्थिक उद्दिष्ट्यांची जाणीव करून देतो व त्यामुळे संपूर्ण आर्थिक आयुष्याचा आढावा घेऊन त्या नुसार निर्णय घेण्यास मदत होते.  
 
ओंकार : हो, 'रँडम' / दिशाहीन काही करू नये … इतर कुठल्याही ज्ञानापेक्षा आपले स्वतःचे उद्दीष्ट्ये जाणून घेणे महत्त्वाचे आणि त्या नुसारच मार्गक्रमण करावे. ह्या साठी आर्थिक नियोजन फार महत्त्वाचे आहे. आपली आर्थिक वागणूक आपल्या आखून दिलेल्या प्लॅन नुसार होत राहिल्यास ताण-तणाव ही जाणवत नाही.  

पप्पू : जास्तीत जास्त टिकून खेळ करायचा असल्यास शिस्त आणि सबुरी दोन्ही खूप जरुरी आहे. फक्त एखाद्या 'मॅच' पुरता विचार न करता आपल्या संपूर्ण कारकिर्दीचा विचार करून, तंदुरुस्ती राखून खेळ करावा. म्हणजे, मोठी विजयी मालिका पदरात पाडता येईल.  

ओंकार : अरे वा, किती सुंदर ! जमलंय मित्रा ! 'फायनांशियल प्लँनिंग' मुळे गुंतवणुकीतील इमोशन्स बाजूला सारण्यात यश येते व लक्ष विचलित होत नाही. म्हणजेच पैसे वायफळ खर्च होत नाहीत. शिवाय समोर उद्दिष्ट्ये असली की ती साध्य करण्याची प्रेरणा आपोआप मिळते.  

पप्पू : 'ओके'. आता मी लवकरच माझे आर्थिक नियोजन करून घेतो म्हणजे 'हेल्थ' आणि 'वेल्थ', या दोन्हींकडे व्यवस्थित लक्ष ठेवता येईल. माझ्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग प्रशस्त केल्या बद्दल धन्यवाद मित्रा !  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com