तुम्ही स्वत:च्या वेतनातील काही भाग FD मध्ये कशासाठी गुंतवावा ?

जाहिरात
Wednesday, 30 September 2020

देशातील 21 शतकातील तरुण वर्ग हा स्टॉक मार्केटमधील अस्थिरतेविषयी अधिक सावध असल्याचे दोन वर्षांपूर्वी वैश्विक बाजारपेठ सर्व्हेक्षण कंपनीची भारतीय शाखा युगर्व्ह आणि मिंट यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या अभ्यासातून निदर्शनास आले. त्याशिवाय, गुंतवणूकदाराच्या वयाच्या मानाने ते श्रीमंत असल्याचे देखील या सर्व्हेक्षणात स्पष्ट झाले.

देशातील 21 शतकातील तरुण वर्ग हा स्टॉक मार्केटमधील अस्थिरतेविषयी अधिक सावध असल्याचे दोन वर्षांपूर्वी वैश्विक बाजारपेठ सर्व्हेक्षण कंपनीची भारतीय शाखा युगर्व्ह आणि मिंट यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या अभ्यासातून निदर्शनास आले. त्याशिवाय, गुंतवणूकदाराच्या वयाच्या मानाने ते श्रीमंत असल्याचे देखील या सर्व्हेक्षणात स्पष्ट झाले. ज्यामुळे देशातील युवा, शहरी लोकसंख्येच्या सवयीची परिभाषा उघड झाली. प्रौढतेकडे झुकणाऱ्या सुमारे 48 टक्के तरुणाईने इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्याचे याच अभ्यासात दिसून आले. तर वय वर्ष 22 ते 28 दरम्यानच्या युवावर्गापैकी केवळ 4 टक्के गुंतवणुकदारांनी इक्विटीत गुंतवणूक केल्याने आढळले. तसेच कमी श्रीमंत असलेल्या युवकांनी गुंतवणुकीकरिता सर्वात सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणाऱ्या फिक्स्ड डिपॉझीटना पसंती दिल्याचे दिसते. 

मागील वर्षाच्या अखेरीस टाटा कॅपिटल्सद्वारे करण्यात आलेल्या आणखी एका सर्व्हेक्षणात दिसून आले की, जनरेशन झेडचा विश्वास हा गुंतवणूक करून संपत्ती निर्मितीत होता. जवळपास 39 प्रतिसादकर्त्यांनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेनुसार दरमहिन्याला ते मिळवत असलेल्या उत्पन्नापैकी केवळ 25 टक्के भाग गुंतवतात. या सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या 1,010 प्रतिसादकर्त्यांपैकी 34 टक्क्यांनी त्यांचा पैसा फिक्स्ड डिपॉझीटमध्ये सुरक्षित ठेवल्याचे सांगितले.  

या सर्वेक्षणांमुळे अशी खात्री पटली की, तरुण विशेषत: अनिश्चिततेच्या आणि बाजारपेठेतील अत्याधिक बदलाच्या वेळी त्यांचे पैसे कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. तसेच स्थिर ठेवी हा सर्वात लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय आहे. यावर्षी झालेल्या आर्थिक मंदीचा परिणाम प्रत्येक देशातील कोट्यावधी कामगारांवर झाला. दीर्घकालीन विचार करणे आणि आर्थिक स्थिरता मिळविण्यासाठी पैशाची बचत करणे फार महत्त्वाचे झाले आहे.

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशन (आयएलओ) आणि एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी)च्या संयुक्त अहवालानुसार मार्च महिन्याच्या पूर्वार्धापासून भारतातील 41 लाख तरुणांनी नोकऱ्या गमावल्या. एकट्या जुलै महिन्यात पाच दशलक्ष वेतनधारकांनी नोकरी गमावल्याचे अहवालातून स्पष्ट होते. सध्या हातात काम असलेल्या व्यावसायिकांनी आधी कधीही नव्हते त्यापेक्षा अधिक रक्कम गुंतवणे महत्त्वाचे झाले आहे. जेणेकरून आगामी काळातील अनिश्चिततेचे नियोजन शक्य होईल. मागील काळात स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा पर्याय आकर्षक होता. मात्र आता त्यात महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे आढळते. कारण आता हातात काम असलेले व्यावसायिक अल्प-जोखमीच्या पर्यायांकडे वळताना दिसतात.

तुम्ही स्वत:च्या वेतनाचा काही भाग बजाज फिनसर्व एफडी’मध्ये कशासाठी गुंतवावा?

बजाज फायनान्स अन्य एनबीएफसी आणि पारंपरीक बँकांच्या तुलनेत 12 महिने ते 60 महिन्यांच्या कालावधीसाठी सरासरी fixed deposits (फिक्स्ड डिपॉझीट) काही highest fixed deposit rates (सर्वोच्च फिक्स्ड डिपॉझीट रेट्स) देऊ करते. गुंतवणुकदारांना ठरावीक पेआऊटसोबत नॉन-क्यूम्यूलेटीव्ह किंवा क्यूम्यूलेटीव्ह एफडीचा पर्याय असतो. जिथे थेट गुंतवणुकदाराच्या खात्यात परिपक्व रक्कम जमा करता येते. बजाज फायनान्स एफडी’ला देशातील सर्वोच्च स्थिर क्रमवारीचे पाठबळ असल्याने एखाद्याला स्वत:च्या पैशाची चिंता करण्याची आवश्यकता नसते. ही स्थिर क्रमवारी देशातील सर्वात मोठ्या क्रेडीट रेटींग एजन्सी क्रिसिलद्वारे एफएएए (स्थिर), आणि आयसीआरएद्वारे एमएएए (स्थिर)कडून देण्यात आल्या आहेत.

जेव्हा तुम्ही गुंतवणुकीचा प्रवास सुरू करता तेव्हा दीर्घ गुंतवणूक पटलावर दीर्घकाळाचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. सध्याच्या क्षणी Bajaj Finance online FDs सोबत सुरक्षा आणि खात्रीशीर परतावा असे दोन फायदे फिक्स्ड डिपॉझीट पर्याय देऊ करते. ज्याद्वारे 7.20 टक्क्यांचे व्याज मिळते. त्याशिवाय, बजाज फायनान्स fixed deposit scheme तुम्हाला रु. 25,000 च्या एकरकमी किंवा दर महिन्याला रु. 5,000 ची सिस्टीमॅटीक डिपॉझीट प्लान (एसडीपी)ने गुंतवणुकीची सोय देऊ करते. त्यासाठी गुंतवणूकदार हा स्वत:च्या सोयीनुसार कालावधी निवडू शकतो.

तुम्ही दर महिन्याला रु. 50,000 कमावता असे समजू. जरी तुम्ही दर महिन्याला 5 वर्षांसाठी रु. 5000 (तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 10 टक्के) याप्रमाणे गुंतवणूक केल्यास, त्या काळात तुम्ही अशाप्रकारे बचत करू शकता (तुम्ही 5 वर्षांच्या कालावधीत 48 डिपॉझीट्स करू शकता.) 

फिक्स्ड डिपॉझीट प्रकार

गुंतवणूक (रु.)

व्याज (%)

व्याज (रुपयांत)

एकूण पेआऊट (रु.)

वरिष्ठेतर नागरीक (ऑनलाईन)

2,40,000

7.2

99,744

3,39,744

जर तुम्ही एसडीपी’च्या माध्यमातून पाच वर्षांसाठी दर महिन्याला रु. 10,000, रु. 15,000 किंवा रु. 20,000 ची गुंतवणूक 48 डिपोझीट्सद्वारे केल्यास पाच वर्षांचा कालावधी संपताना एकूण पेआऊटची अपेक्षा ठेवता येते.

फिक्स्ड डिपॉझीट प्रकार

गुंतवणूक (रु.)

व्याज (%)

प्रती जमा रकमेवर कमावलेले व्याज (रु.)

एकूण व्याज (रु.)

एकूण पेआऊट (रु.)

वरिष्ठेतर नागरीक (ऑनलाईन)

4,80,000

7.2

4,157

1,99,536

6,79,536

वरिष्ठेतर नागरीक (ऑनलाईन)

7,20,000

7.2

6,235

2,99,280

10,19,280

वरिष्ठेतर नागरीक (ऑनलाईन)

9,60,000

7.2

8,314

3,99,072

13,59,072

नोंद: वरील मोजणीतील आरओआय वास्तविक देऊ करण्यात येणाऱ्या दरांच्या तुलनेत 4 बीपीएसपर्यंत भिन्न असू शकतो

पाच वर्षांत (एकूण 48 डिपॉझीटमध्ये) बजाज फायनान्स ऑनलाईन एफडी’मध्ये रु. 20,000 प्रती डिपॉझीट याप्रमाणे रक्कम गुंतवल्यास तुम्हाला रु. 4 लाख इतके व्याज कमावता येईल असे वरील आकडेमोड दर्शवते! अगदी तुम्ही प्रती महिना रु. 10,000 बाजूला काढू शकता. त्यामुळे पाच वर्षांच्या कालावधीत रु. 2 लाखांचे व्याज सहज कमावता येईल. जी एक महत्त्वाची रक्कम ठरते.

बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटमध्ये गुंतवणूक करण्यात जोखीम नसल्याने या माध्यमातून तुम्हाला गुंतवणूक वाढवता येते. सध्याच्या परिस्थितीत नोकरीची शाश्वती राहिलेली नाही. शिवाय, महागाई वाढते आहे. त्यामुळे बळकट आर्थिक धोरण असणे आवश्यक ठरते. फिक्स्ड डिपॉझीटमुळे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा, स्थैर्य आणि खात्रीशीर परतावा मिळतो. सध्याच्या स्थितीत हातात काम असलेल्या व्यावसायिकांनी त्याला प्राधान्य दिले पाहिजे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why should you invest a portion of your salary in FDs