शेअर बाजारात हजारो कमावण्याची संधी... पण? 

शनिवार, 20 एप्रिल 2019

शेअर बायबॅक म्हणजेच कंपनीकडून केली जाणारी शेअरची पुनर्खरेदी होय. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या शेअरच्या किंमतीपेक्षा अधिक किंमत देऊन शेअर खरेदी करते.शेअर बायबॅक करण्यामागे कंपनीची वेगवेगळी करणे असू शकतात, जसे की भागधारकांना त्यांचे पैसे (लोकांकडून उभारलेले भाग-भांडवल) परत करणे होय. शिवाय नजीकच्या काळात जर कंपनीच्या व्यवसाय विस्ताराच्या काही योजना नसतील तसेच कंपनीकडे अतिरिक्त निधी असेल तरी देखील शेअर बायबॅक केले जाते.

शेअर बायबॅक म्हणजेच कंपनीकडून केली जाणारी शेअरची पुनर्खरेदी होय. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या शेअरच्या किंमतीपेक्षा अधिक किंमत देऊन शेअर खरेदी करते.शेअर बायबॅक करण्यामागे कंपनीची वेगवेगळी करणे असू शकतात, जसे की भागधारकांना त्यांचे पैसे (लोकांकडून उभारलेले भाग-भांडवल) परत करणे होय. शिवाय नजीकच्या काळात जर कंपनीच्या व्यवसाय विस्ताराच्या काही योजना नसतील तसेच कंपनीकडे अतिरिक्त निधी असेल तरी देखील शेअर बायबॅक केले जाते. कंपनीच्या शेअरचा भाव खूप खाली असेल असे  कंपनीला वाटल्यास कंपनी अशा पडलेल्या भावात पुनर्खरेदी जाहीर करून कंपनीतील स्वतःचा हिस्सा वाढवायचा प्रयत्न करते. यामुळे शेअरची बाजारातील किंमत देखील वधारण्यास सुरुवात होते. 

शेअर बायबॅकनंतर जर भविषयात कंपनीचे कामकाज व्यवस्थित सुरु राहिले तर शेअरची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पुन्हा शेअरची किंमत वाढण्यास सुरुवात होते. 

शेअर बायबॅक म्हणजे?

बायबॅकमध्ये सहभागी होण्यासाठी: 
तुमच्याकडे बायबॅक जाहीर केलेल्या कंपनीचे शेअर असतील तर तुम्ही बायबॅकसाठी पात्र होऊ शकता. किंवा तुमच्याकडे बायबॅक जाहीर केलेल्या कंपनीचे शेअर नसतील तर तुम्ही ते बाजारातून आताच्या कमी किमतीत खरेदी करून बायबॅकसाठी अर्ज करू शकता. कंपनीकडून 'रेकॉर्ड डेट' जाहीर करण्यात येते. त्यामुळे बायबॅकमध्ये सहभागी व्हायचे असेल तर मात्र कंपनीने जाहीर केलेल्या 'रेकॉर्ड डेट'च्या दिवशी तुमच्याकडे कंपनीचे शेअर असणे आवश्यक आहे. 

मात्र बायबॅकमध्ये सहभागी होऊन फायदा मिळविण्यासाठी तुम्ही कंपनीचे शेअर खरेदी करणार असाल तर त्याआधी काही गोष्टी माहित करून घ्या. 
- बायबॅकमध्ये सहभागी होऊन फायदा मिळविण्यासाठी जरी तुम्ही शेअर खरेदी केले असले तरी ते सर्व कंपनी बायबॅक करेलच असे नाही. 
- शिवाय किरकोळ गुंतवणूकदारांकडून किती शेअर खरेदी करायचे हे कंपनीकडून ठरविले जाते. 
- बायबॅकची प्रक्रिया साधारण दोन ते तीन महिन्यांची असते. 
 
रेकॉर्ड डेट म्हणजे काय? 
रेकॉर्ड डेट म्हणजे कंपनी एक ठराविक दिवस निश्चित करते, त्यादिवशी तुमच्या डिमॅट खात्यात त्या कंपनीचे शेअर असतील तर तुम्ही लाभांश (डिव्हीडंड), बोनस शेअर किंवा शेअर बायबॅकसाठी पात्र ठरू शकता. 

लवकरच येणार विप्रोचा बायबॅक 
भारतातील तिस-या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी 'विप्रो' पुन्हा 'शेअर बायबॅक' करणार आहे. कंपनीने 10 हजार 500 कोटींची शेअर पुनर्खरेदी अर्थात शेअर बायबॅक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीकडून तब्बल 10 हजार 500 कोटींचे 32.3 कोटी शेअर बायबॅक केले जाणार आहेत. या योजनेत कंपनीचे मुख्य प्रवर्तक अझीम प्रेमजी सहभागी होणार आहे. या योजनेत कंपनी 325 रुपये प्रतिशेअरप्रमाणे खरेदी करणार आहे. गुरुवारी विप्रोचा समभाग 284.80 रुपयांवर बंद झाला. कंपनीकडून शेअर पुनर्खरेदी 15.4 टक्के प्रीमियमवर करण्यात येणार आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2017 मध्ये कंपनीने प्रतिशेअर 320 रुपयांनी 11 हजार कोटींचे समभाग पुनर्खरेदी केले होते. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 171,852.84 कोटींचे बाजारभांडवल आहे.

(डिस्क्लेमर: शेअर बाजारातील जोखोम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने आणि स्वतःच्या जबाबदारीवरच घ्यावे.)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why would a company buy back its own shares?