Gold Rate: सोन्याचा भाव 'रेकॉर्ड ब्रेक' करणार? उच्चांकापासून फक्त 2000 रुपये दूर

Gold Rate Updates: सोन्याचा दर गेल्या 19 महिन्यांच्या उच्चांकावर आहे.
gold silver rate
gold silver rateSakal

Gold Rate Updates: रशिया-युक्रेन युद्ध, यूएस फेड व्याजदर, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती तसेच इतर वस्तूंच्या किमती वाढणे तसेच भारतीय रुपयामध्ये डॉलरच्या तुलनेत झालेली घसरण यामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याचा भाव आज १९ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आणि कमोडिटी फ्युचर मार्केटमध्ये आज सकाळच्या सत्रात ५४,००० ची पातळी गाठली.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये आज सोन्याचा दर आज 54,190 प्रति 10 ग्रॅम आहे. हा दर सर्वकालीन उच्चांकापासून फक्त 2000 रुपये दूर आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्यानं विक्रमी 56,191 प्रति तोळा हा उचांकी दर गाठला होता. (Will gold price break 'record'? Just Rs 2,000 away from all time high)

gold silver rate
२४ कॅरेट सोन्याचा दर वाढला! ग्राहकांना फटका

कमोडिटी बाजारातील तज्ञांच्या मते, रशिया युक्रेनमधील वाढत चाललेलं युद्धाचा (Russia Ukraine War) परिणाम सोन्याच्या भावावरही होत आहे. भारत मोठ्या प्रमाणात आयात करतो. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती तसेच भारतीय रुपयाची डॉलरच्या तुलनेत झालेल्या घसरणीमुळे सोन्याचा दर 19 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. हिच परिस्थिती कायम राहिल्यास सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकही तोडू शकते.

gold silver rate
येत्या वर्षात सोनं जाणार 60 हजाराच्या पार; सोन्याचा दर 63 हजारांवर जाण्याची शक्यता

कमोडिटी बाजारातील तज्ञांनी असेही सांगितले की, रशिया-युक्रेन संघर्षावर बरेच काही अवलंबून आहे. गुंतवणूकदारांना रशिया-युक्रेनच्या बातम्यांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे, कारण युद्धविरामाच्या दिशेने कोणतंही पाऊल उचललं गेल्यास सोन्याच्या किमतीत तीव्र घट होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com