'विप्रो' 19 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर

वृत्तसंस्था
बुधवार, 23 जानेवारी 2019

मुंबई: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या 'विप्रो'ने 19 वर्षातील उच्चांकी पातळी गाठली आहे. मुंबई शेअर बाजारात विप्रोचा शेअर 2.22 टक्क्यांनी म्हणजेच 7.70 रुपयांनी वधारला असून 354.15 रुपयांवर व्यवहार करतो आहे. शेअरने आज इंट्राडे व्यवहारात 355.45 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. ही शेअरची वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे. याआधी  23 फेब्रुवारी 2000 मध्ये शेअरने 353.25 रुपयांची पातळी गाठली होती. शिवाय 'विप्रो'ने नुकतीच बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने तीनास एक शेअर बोनस जाहीर केला आहे. 

'टेक्निकल अनॅलिस्ट' म्हणजेच तांत्रिक विश्लेषकांनी येत्या काही दिवसात विप्रोच्या शेअरमध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तांत्रिक विश्लेषकांच्या मते, येत्या काही दिवसात 'विप्रो' 360.56 रुपयांची पातळी गाठण्याची शक्यता आहे. 

विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 1,931 कोटी रुपये होता. कंपनी 1:3 बोनस शेअर देणार आहे. म्हणेजच विप्रोच्या 3 शेअरवर आणखी एक शेअर बोनस मिळणार आहे. समजा गुंतवणूकदाराकडे 3 शेअर असतील तर त्याला आणखी एक शेअर मिळणार आहे. याचबरोबर कंपनीने दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरसाठी एक रुपया लाभांश देण्याची घोषणा केली आहे.  

यादरम्यान कंपनीचा महसूल 14 हजार 666 कोटींवरून वाढून 15 हजार 150.6 कोटी रुपयांवर पोचला आहे. त्यात 10.73 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचे प्रतिशेअर उत्पन्न (ईपीएस) वधारले असून ते 5.57 रुपयांवर पोचले आहे. जे गेल्यावर्षी याच तिमाहीत 4.03 रुपये होते. 

गेल्या दोन वर्षात कंपनीने दुसऱ्यांदा बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. वर्ष 2017 मध्ये कंपनीने एकास एक शेअर (1:1) बोनस शेअर दिला होता. शिवाय त्याचवर्षी कंपनीने 11 हजार 000 कोटी रुपयांची शेअर बायबॅक ऑफर आणली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wipro hits near 19-year high