"विप्रो"चा नफा 2 हजार 388 कोटींवर 

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

नवी दिल्ली: माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या "विप्रो"ला पहिल्या तिमाहीत 2 हजार 388 कोटींचा नफा झाला. यंदा नफ्यात 12.6 टक्‍क्‍यांची वाढ झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 2 हजार 121 कोटींचा नफा झाला होता. 

बॅंकिंग, विमा अणि इतर वित्तीय सेवा व्यवसायातून कंपनीला चांगला महसूल मिळाला आहे. 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत 14 हजार 716 कोटींचा महसूल मिळाला. यामध्ये 5.3 टक्‍क्‍यांची वृद्धी झाली. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत कंपनीला 13 हजार 978 कोटींचा महसूल मिळाला होता. नुकताच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेला विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी संबोधित केले. कंपनीला उज्ज्वल भवितव्य असल्याची ग्वाही प्रेमजी यांनी भागधारकांना दिली. गेल्या महिन्याच्या अखेरीस प्रेमजी कंपनीच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले. अबीदअली निमुचवाला हे येत्या 31 जुलैपासून विप्रोचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारतील, असे कंपनीने म्हटले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wipro Q1 profit falls 4 pct