esakal | ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फॉर्म होम’

बोलून बातमी शोधा

twitter

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फॉर्म होम’

sakal_logo
By
पीटीआय

सॅन फ्रान्सिस्को - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून सोशल मीडिया कंपनी ट्विटरने जगभरातील ५ हजार कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. तसेच, कार्यालयीन महत्त्वाच्या बैठकाही शक्‍य असल्यास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्याची सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा विषाणूचा विशेष प्रभाव असलेल्या हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियातील कर्मचाऱ्यांना घरून काम करणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय कोरोना विषाणूचे रुग्ण सापडलेल्या जगभरातील विविध भागांतील नियोजित बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, कार्यालयात काम करणे शक्‍य आहे, अशा कर्मचाऱ्यांसाठी विशेष खबरदारी घेण्याची सूचना कंपनीने केली आहे.

अर्थ सचिवपदी अजय भूषण पांडे 

कंपनीने उचललेल्या या पावलामुळे कर्मचाऱ्यांप्रती असलेल्या भावनेचा आदर म्हणून सोशल मीडियावर कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डॉर्सी यांचे कौतुक होत आहे. तसेच,  #webackjack हा ट्रेंड सुरू आहे.