सरकारी बॅंकांच्या कामकाजाची वेळ बदलणार

सरकारी बॅंकांच्या कामकाजाची वेळ बदलणार

मुंबई : राज्यात शुक्रवारपासून (ता.1) सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांसाठी सामायिक वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. यामुळे 1 नोव्हेंबरपासून राज्यातील सरकारी बॅंका एकाच वेळी सुरू आणि बंद होणार आहेत. सध्या बहुतांश बॅंकांचे कामकाज सुरू होण्याची आणि बंद होण्याची वेळ वेगवेगळी आहे.

काही बॅंका सकाळी 10 वाजता कामकाज सुरू करतात; तर काही बॅंका सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरू होतात. अर्थ खात्याच्या निर्देशांनुसार सर्व बॅंकांनी एका ठराविक वेळेत कामकाज सुरू व बंद करणे आवश्‍यक आहे. बॅंक अधिकाऱ्यांच्या समितीने महाराष्ट्रातील सरकारी बॅंकांच्या कामकाजाचे सामायिक वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार राज्यातील सरकारी बॅंका सकाळी 9 वाजता सुरू होतील आणि संध्याकाळी 4 वाजता बंद होणार आहेत. तसेच काही बॅंकांचे कामकाज सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत चालेल, असेही समितीने म्हटले आहे. 
 

हे आहेत नवे होणारे बदल 

"एसबीआय'च्या जवळपास 42 कोटी ग्राहकांना नोव्हेंबरपासून व्याजातील कपातीचा फटका बसणार आहे. बॅंकेकडून बचत खाते आणि ठेवींवरील व्याजदरात कपात करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून (ता.1) केली जाणार आहे. एक लाखांपर्यंत शिल्लक असलेल्या बचत खात्यावर ग्राहकांना 3.25 टक्के व्याज मिळेल. बॅंकेने बचत खात्यावरील व्याजदरात 0.25 टक्‍क्‍याची कपात केली आहे. यापूर्वी बॅंकेने एक वर्षे ते दोन वर्षांपर्यंतच्या किरकोळ आणि मोठ्या रकमेच्या ठेवींवरील व्याजदरात 0.10 ते 0.30 टक्के कपात केली असून ती 10 ऑक्‍टोबरपासून लागू झाली आहे. 

 
डिजिटल पेमेंटवरील शुल्कातून ग्राहकांची अंशत: सुटका 

वार्षिक 50 कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांकडून शुक्रवारपासून (ता. 1) डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना व्यवहार शुल्कातून सूट दिली जाणार आहे. डिजिटल पेमेंटवरील शुल्क आणि मर्चंट डिस्काउंट रेटमधून ग्राहकांची सुटका करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार 50 कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांकडून 1 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी केली जाईल. 
 

web title : The working hours of government banks will change

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com