world consumer day : खरेदीत फसवणूक नकोय ना? मग हे कराच!

शुक्रवार, 15 मार्च 2019

शॉपिंगची हौस कुणाला नसते? खासकरून महिलांना तर फक्त कारण हवे, शॉपिंग हा त्यांचा आवडता विषय. पण अनेकदा कुठलीही वस्तू खरेदी करताना तिचा दर्जा, किंमत आणि प्रत यात फसगत होऊ शकते. ऑनलाईन व्यवहारात ही शक्यता जास्त असते. आज जागतिक ग्राहक दिन. यानिमित्त खरेदी करताना काय घ्यायची काळजी, आणि चुकून लुबाडले गेलो तर तक्रार कशी आणि कुणाकडे करायची याविषयी जाणून घेऊया.

ग्राहक म्हणून ही घ्या काळजी
-  MRP पेक्षा जास्त पैसे देऊ नका.
- खरेदी केल्यानंतर बिल मागून घ्या, हा ग्राहकाचा अधिकार आहे.
- ऑनलाईन खरेदी करताना जागरुक असावे.
- कोण्त्याही फसव्या जाहिरातिंना आपण बळी पडणार नाही खाची काळजी घ्या.
- प्रत्येक वस्तू, खाद्य पदार्थ, औषधे खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासा.
- खरेदी करताना तिचा दर्जा, किंमत आणि प्रत यात फसगत होऊ शकते. त्यामुळे ग्राहकाने सजक राहायला हवे.
- आपल्या मालाची चूकीची आणि दिशाभूल करणारी माहिती कंपनीने दिली किंवा तशी जाहिरात केली तर ग्राहक म्हणून तुम्ही तक्रार करु शकता.
- ऑनलाईन खरेदी केल्यानंतर आपल्या खात्यातुन नेमकी रक्कम वजा झाली आहे याची खात्री करा.
- शक्यतोवर डेबिट ऐवजी क्रेडीट कार्ड वापरुन ऑनलाईन शॉपिंग करा. बँक क्रेडीट कार्डवर जी गॅरेंटी देते ती डेबिट कार्डवर देत नाही.   
- ऑनलाईन खरेदीसाठीचे पासवर्ड वोळोवोळी बदलत रहा. 
- सोन्याची अथवा चांदिची खरेदी करताना हॉलमार्क किंवा गुणवत्तेचे चिन्ह बघायला विसरु नका.
- सोने खरेदी करताना शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. सोने किती कॅरेटचे आहे चेक करा. दागिन्यात लागलेल्या हिऱ्यांसाठी वेगळे प्रमाणपत्र घ्या.
- ग्राहक हक्क संरक्षणासाठी काही कायदे आहेत. त्याची माहिती करुन घ्या.
- jagograhakjago.com ही वेबसाईट किंवा हेल्पलाईन नंबर देखील ग्रहकांसाठी आहेत. ज्याची तुम्हाला मदत होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world consumer day if you Do not want fraud Then take care