भारताला दोन गोष्टींमुळे पत्करावी लागेल जोखीम; WEF चा इशारा

Sadia JAhidi, WEF
Sadia JAhidi, WEF
Summary

वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमने ग्लोबल रिस्क्स रिपोर्ट जारी केला असून त्यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांबाबत माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - गेल्या २ वर्षांपासून जगभरात कोरोनाने (Corona) थैमान घातलं आहे. याचा परिणाम म्हणजे डिजिटलकडे लोकं मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेचा (Cyber Security) प्रश्न निर्माण झाला आहे. जागतिक पातळीवर सायबर सुरक्षेचा धोका वाढला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (World Economic Forum) मंगळवारी सर्व्हे जारी केला. यानुसार तरुणाईचा अपेक्षाभंग, डिजिटल असमानता, आंतरराज्य वाद इत्यादी गोष्टी भारताच्या (India) अर्थव्यवस्थेला जोखमीच्या ठरत आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून पुढच्या आठवड्यात दावोस अजेंडा मिटिंगच्या आधी ग्लोबल रिस्क्स रिपोर्ट २०२२ जारी करण्यात आला. त्यात म्हटलं आहे की, वातावरण (परिवर्तन) बदलासंबंधित जोखीम यावेळी परिणामाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या समस्येपैकी एक आहे. जगातील १० पैकी ५ जागतिक धोके हे वातावरण आणि पर्यावरणाशी संबंधित आहेत.

कोरोनाचं संकट सध्या जगावर ओढावलं आहे. अशावेळी जगाला जोखमीच्या असलेल्या पाच मुद्द्यांमध्ये वातावरण बदलाचं संकट, वाढती सामाजिक दुफळी, सायबर सुरक्षेचा प्रश्न आणि जागतिक सुधारणेत असमानता यांचा समावेश आहे. ग्लोबल सर्व्हेमध्ये अशी बाब समोर आली आहे की, सहापैकी फक्त एक जण सकारात्मक आहे तर १० पैकी एका व्यक्तीला असं वाटतं की जागतिक सुधारणा होत राहील. सर्व्हेमधून असाही इशारा देण्यात आला आहे की, कोरोनामुळे सामाजिक अंतराचा धोका वाढतच राहील. जागतिक आर्थिक सुधारणा येत्या काही वर्षात असमान असतील असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Sadia JAhidi, WEF
ट्रान्सजेंडर व्यक्तीला पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक; होतेय टीका!

भारताबाबतच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, आंतरराज्य संबंधांमध्ये असणारा कटुपणा, मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये कर्जाचे संकट, तरुणांचा अपेक्षाभंग आणि डिजिटल असमानता या गोष्टी देशाच्या अर्थव्यवस्थेला धोक्याच्या आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सादिया जाहिदी यांनी जागतिक नेत्यांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, जगासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी समन्वयाची भूमिका घेण्याची गरज सध्या आहे.

कमी कालावधीसाठी जगासाठीच्या चिंतेमध्ये सामाजिक दुही, उपजिविकेचं संकट आणि मानसिक आरोग्यात घसरण यांचा समावेश आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, जागतिक अर्थव्यवस्थेत बदल पुढच्या तीन वर्षात अस्थिर आणि असमान असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com