Share Market: 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा 'हा' शेअर देईल दमदार नफा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share Market: 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा 'हा' शेअर देईल दमदार नफा...

कोरोनानंतर प्रवासात वाढ झाल्याने देशांतर्गत टूरिझम इंडस्‍ट्रीही तेजीत आली आहे. मोठ्या हॉटेल्सासोबतच मिड-प्राइस्‍ड हॉटेल सेगमेंटलाही याचा फायदा होतो आहे. अशातच लेमन ट्री होटल्‍स लिमिटेड (Lemon Tree hotels Limited) कंपनीवर फोकस आहे. त्यामुळेच ब्रोकरेज रिसर्च फर्म व्हेंचुराने पोर्टफोलिओमध्ये लेमन ट्रीचे शेअर्स समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. 8 सप्टेंबर 2022 ला शेअरची किंमत 77 रुपयांवर होती. गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये 91 टक्क्यांहून अधिक वाढ दिसली आहे.

Lemon Tree - 91.6 रुपयांचे टारगेट
ब्रोकरेज फर्म वेंचुराने लेमन ट्री हॉटेल्सबाबत (LTHL) खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच, 24 महिन्यांच्या दृष्टीकोनातून (FY25 PE of 28X) 91.6 रुपयांचे टारगेट दिले आहे. गुरुवारी हा शेअर 77 रुपयांवर बंद झाला. अशा प्रकारे, सध्याच्या किमतीतून सुमारे 19 टक्के परतावा मिळू शकतो. 2022 मध्ये आतापर्यंत स्टॉकचा परतावा 58 टक्क्यांहून अधिक झाला आहे. तर, गेल्या 6 महिन्यांत या शेअरने 32 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स 659 तर निफ्टी 174 अंकांवर

लेमन ट्री हॉटेल्सचा (LTHL) पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाइड असल्याचे ब्रोकरेज हाऊस व्हेंचुराचे म्हणणे आहे. यात अपस्केल सेगमेंटचा ऑरिका (Aurika) ब्रँड आहे, ज्यामध्ये 1994 खोल्या असलेली दोन हॉटेल्स आहेत. त्याचप्रमाणे वरच्या मिडस्केलमध्ये LT प्रीमियर आणि कीज प्राइमा आहेत. या ब्रँडमध्ये 2554 रुम क्षमतेची 19 हॉटेल्स आहेत.

लेमन ट्री आणि की मिडस्केलमधील आहेत, या ब्रँडमध्ये 4191 खोल्या असलेली 51 हॉटेल्स आहेत. त्याच वेळी, इकॉनॉमी क्लासमध्ये रेड फॉक्स आणि कीज लाइट आहे, ज्यामध्ये 15 हॉटेल्स आहेत. ज्याची खोली क्षमता 1550 आहे. याशिवाय, कंपनीच्या पाइपलाइनमध्ये 2400 खोल्या आहेत, ज्या 2025 पर्यंत सुरु होतील. अशा प्रकारे, LTHL च्या 65 डेस्टिनेशंसवर 110 हॉटेल्समध्ये सुमारे 10,600 खोल्या असतील.

हेही वाचा: Hotel Service Tax : कायदा काय सांगतो? 'या' गोष्टी ठेवा लक्षात

कंपनीचा ऑक्युपन्सी रेट 32 टक्क्यांवरुन (लो बेस इफेक्ट) 78 टक्क्यांनी वाढेल आणि सरासरी रूम रेट (ARR) 13.3 टक्क्यांनी वाढून 5037 रुपये होईल. याशिवाय, कंपनीला सेक्टरल टेलविंड्सचाही फायदा होईल.

अर्थसंकल्पात, सरकारच्या पायाभूत सुविधांच्या खर्चात मोठी वाढ, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनात पुनरुज्जीवन, प्रवासात वाढ यामुळे या क्षेत्राला फायदा होईल. ज्याचा फायदा लेमन ट्री हॉटेल्सनाही होईल. पण, कंपनीला कमी प्रमोटर्स होल्डिंग आणि तारण प्रमोटर्स होल्डिंग तसेच जगभरात कोविड प्रकरणांमध्ये वाढ आणि पाइपलाइन इन्व्हेंटरी सुरू होण्यास लागणारा वेळ या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा: Stock Market : आज सेन्सेक्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 57, 823 वर उघडला

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Worth Of This Share Is Less Than 100 Rs Will Give Best Return

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..