esakal | डब्ल्यूपीआय चलनवाढ घटली | Wholesale price update
sakal

बोलून बातमी शोधा

WPI index

डब्ल्यूपीआय चलनवाढ घटली

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : सप्टेंबर महिन्यात होलसेल किमतींवर आधारित चलनवाढ (wholesale price) होलसेल प्राईज बेस्ड इन्फ्लेशन कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यातील 11.39 टक्क्यांवरून ही चलनवाढ 10.66 टक्क्यांवर आली. मुख्यतः अन्नधान्याच्या किमती घटल्याने डब्ल्यूपीआय (WPI Price) चलनवाढही कमी झाली. मागीलवर्षी म्हणजे सप्टेंबर 2020 मध्ये या चलनवाढीचा दर 1.32 टक्के होता. नंतर खनिज तेल, धातू, बिगरखाद्य वस्तू, अन्न उत्पादने, क्रूड ऑईल, सीएनजी, रसायने व त्याच्याशी संबंधित उत्पादने यांच्या दरवाढीमुळे हा दर यावर्षात भरपूर वाढला. मात्र आता तो हळुहळू कमी होत असल्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: रावण दहनाच्या कार्यक्रमावरून आदिवासी संघटना एकमेकांच्या विरोधात

उद्योग आणि व्यापार मंत्रालयाने आज ही आकडेवारी जाहीर केली. भाज्यांच्या किमती घटल्याने अन्नधान्याशी संबंधित चलनवाढ सतत पाचव्या महिन्यात कमी झाली. डाळींच्या किमती 9.42 टक्के वाढल्या. इंधन-उर्जा क्षेत्राची चलनवाढ ऑगस्टमधील 26.09 वरून सप्टेंबरमध्ये 24.91 अशी कमी झाली. मात्र कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या क्षेत्रातील चलनवाढ ऑगस्टच्या 40.03 पासून सप्टेंबरपर्यंत 43.92 येथपर्यंत वाढली.

loading image
go to top