
कधीकाळी प्रतितोळा 99 रुपयांना मिळणारं सोनं आज 50 हजारांच्या पुढे गेलं आहे. पाहा, याची वाटचाल कशी होती?
भारतात कायमच सोने ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते कारण सोन्यातली गुंतवणूक कधीही नुकसान करत नाही. 1950 मध्ये सोन्याची किंमत 99 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर 1960 मध्ये सोन्याचे भाव 112 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. म्हणजे 50 ते 60 च्या दशकात सोन्याने गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा दिला. 1970 मध्ये सोने पोहोचले थेट 184.50 रुपये प्रति 10 ग्रॅमवर म्हणजे 60 ते 70 या दहा वर्षात सोन्याने तब्बल 65 टक्के परतावा दिला. 1970 आणि 1980 च्या दशकाचा विचार केल्यास सोन्याची किंमत 184.50 रुपये प्रति 10 ग्रॅमपासून थेट 1,330 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली, याच दशकात गुंतवणुकदारांना सोन्याने तगडा 620 टक्क्यांचा परतावा दिला.
1980 आणि 1990 च्या दशकात 1,330 रुपये प्रति 10 ग्रॅमवरुन सोने पोहोचले 3,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, दशकात गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा मिळाला. 1990 आणि 2000 च्या दशकाचा विचार केल्यास सोने 3,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचे 4,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. या 10 वर्षांत गुंतवणुकदारांना 37.50 टक्के परतावा मिळाला. 1996 मध्ये सोन्याचा दर 5,160 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 1996 से 1998 च्या दरम्यान सोन्याची किंमत घसरली. 5,160 प्रति 10 ग्रॅमपासून दर 4,045 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आता 2000 आणि 2010 च्या दशकावर नजर टाकली तर 4,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवरुन वाढत सोने 18,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले, या काळात गुंतवणुकदारांना 320 टक्के परतावा दिला.
2010 ते 2020 च्या दशकात आणखी बदल झाला. 2020 मध्ये सोने तब्बल 48,651 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. म्हणजे सोने प्रति ग्रॅम 18,500 रुपयांवरुन 48,651 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. या काळात गुंतवणुकदारांना 162 टक्के परतावा दिला. 1950 पासून आतापर्यंत 1970 ते 80 च्य दशकात सगळ्यात भारी परतावा दिला. या काळात सोन्याने आपल्या गुंतवणुकदारांना 620 टक्क्यांचा तगडा नफा दिला. त्यांनंतर 2000 ते 2010 च्या दशकात 320 टक्के हा दुसऱ्यांदा इतका मोठा परतावा दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.