येस बॅंक उभारणार २० हजार कोटी

वृत्तसंस्था
शनिवार, 21 मार्च 2020

आर्थिक संकटात असलेली येस बॅंक संस्थात्मक गुंतवणूकदार, बॅंकांद्वारे ठेवी प्रमाणपत्रांद्वारे २० हजार कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी करणार आहे. 

मुंबई - आर्थिक संकटात असलेली येस बॅंक संस्थात्मक गुंतवणूकदार, बॅंकांद्वारे ठेवी प्रमाणपत्रांद्वारे २० हजार कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी करणार आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रिझर्व्ह बॅंकेच्या पुनर्रचना योजनेनुसार स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली झालेल्या गुंतवणुकीनंतर येस बॅंकेचा भांडवल उभारणीचा हा सर्वांत मोठा प्रयत्न आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि इतर आघाडीच्या खासगी बॅंकांनी येस बॅंकेत गुंतवणूक केली आहे. ठेवी प्रमाणपत्र हा मनी मार्केटमधून भांडवल उभारणीचा पर्याय आहे. बॅंकेत गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या भांडवलाच्या आधारे विशिष्ट कालावधीसाठी हे भांडवल उभारले जाते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yes Bank to build 20 thousand crore