येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना 'ईडी'कडून अटक

वृत्तसंस्था
रविवार, 8 मार्च 2020

- येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना 15 तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचालयनाकडून अटक

नवी दिल्ली : येस बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. मागील 15 तासांपासून त्यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. त्यानंतर आता त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी (पीएमएलए) अटक झाली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राणा कपूर यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. या चौकशीदरम्यान ईडीने येस बँकेच्या व्यवहारावर अनेक आक्षेप घेतले. ईडीने राणा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील संबंधित व्यक्तींच्या कंपनी आणि डीएचएफएलमध्ये झालेल्या व्यवहारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राणा कपूर यांची चौकशी बल्लार्ड इस्टेट येथील एका कार्यालयात झाली. त्यापूर्वी केंद्रीय तपास संस्थेने शुक्रवारी त्यांच्या घरावर छापेमारीची कारवाई केली.

राणा यांना अटक झाल्यानंतर त्यांना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास स्थानिक न्यायालयात हजर केले जाऊ शकते. त्यानंतर त्यांची रवानगी कोठडीत केली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

शनिवारी चौकशी

राणा कपूर यांनी अनियमित कर्जवाटप केल्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात त्यांची शनिवारी चौकशी करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yes Bank founder Rana Kapoor arrested by Enforcement Directorate