esakal | आर्थिक वर्ष 2021-22 पासून तुमची असू शकतात दोन पीएफ खाती
sakal

बोलून बातमी शोधा

epf

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) याबाबत अधिसूचना (Notification) जारी केली आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 पासून तुमची असू शकतात दोन पीएफ खाती

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

-शिल्पा गुजर

जर एखाद्या व्यक्तीचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (EPF) योगदान एका आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, तर त्या व्यक्तीला या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला दोन वेगवेगळे खाती ठेवायला लागतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) याबाबत अधिसूचना (Notification) जारी केली आहे.

हेही वाचा: यापुढे दूरसंचार कंपन्या देणार नाहीत मोबाईल पोर्टिंगवर आकर्षक ऑफर!

यंदाच्या अर्थसंकल्पात भविष्य निर्वाह निधीमध्ये (PF) 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान करपात्र केल्यानंतर हा नियम बनवला आहे. करदात्याला कर मोजणी सोपी जावी, यासाठी एक खाते करपात्र (Taxable) आणि एक करपात्र नसलेल्या (Non Taxable) योगदानाचे असेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेमुळे निर्माण झालेला गोंधळ दूर झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण मर्यादेपलीकडे योगदान असल्यास व्याजावर कर कसा आकारला जाईल, हे या अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले नाही.

हेही वाचा: LIC च्या IPO साठी सरकारने लॉ कंपन्यांकडून दुसऱ्यांदा मागवले RFP

2021-22 या आर्थिक वर्षापासून हा नवा नियम लागू होईल, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. गेल्या वर्षी मार्चपर्यंतच्या योगदानावर कर आकारला जाणार नाही. जर मालकाचे (Employer) एखाद्या व्यक्तीच्या खात्यात योगदान नसेल, तर ही मर्यादा 5 लाख रुपये असेल. एकूण किती कर भरायचा आहे ते करपात्र खात्यातून (Taxable Account) पैसे काढल्यानंतर हिशोब करुन ठरवले जाईल. येत्या काही वर्षांत भविष्यनिर्वाह निधीवरील (Provident Fund) व्याज पूर्णपणे करपात्र असू शकते, असे संकेत या नव्या नियमातून मिळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे .

loading image
go to top