
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती (Crude Oil) वाढल्या आहेत. WTI कच्च्या तेलाचे दर 0.44 टक्क्यांनी वाढत 45.72 डॉलरवर पोहचले असून ब्रेंट क्रूड ऑयल (Brent Crude Oil) चे दर 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 49.06 डॉलर प्रति बॅरल इतके झाले आहेत.
Price Of Petrol Per Litre Today : भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) ने सोमवारनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणतही वृद्धी केलेली नाही. पण यापूर्वी इंधन दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. परिणामी मागील दोन वर्षातील उच्चांक गाठत पेट्रोल दर नव्वदी पार नोंद झाले होते. सध्याच्या घडीला राजधानी दिल्लीतील पेट्रोल दर 83.71 रुपये आणि डिझेलचे दर 73.87 रुपये प्रति लीटर इतका आहे. 20 नोव्हेंबरपासून 15 टप्प्यात इंधन दरात वृद्धी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती (Crude Oil) वाढल्या आहेत. WTI कच्च्या तेलाचे दर 0.44 टक्क्यांनी वाढत 45.72 डॉलरवर पोहचले असून ब्रेंट क्रूड ऑयल (Brent Crude Oil) चे दर 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 49.06 डॉलर प्रति बॅरल इतके झाले आहेत.
भारतीय अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारणा; ‘एडीबी’चा अहवाल
आज देशातील महानगरीत काय आहेत इंधनाचे दर
दिल्ली- पेट्रोल 83.71 रुपये आणि डिझेल 73.87 रुपये प्रति लीटर
मुंबई- पेट्रोल 90.34 रुपये आणि डिझेल 80.51 रुपये प्रति लीटर
कोलकाता- पेट्रोल 85.19 रुपये आणि डिझेल 77.44 रुपये प्रति लीटर
चेन्नई- पेट्रोल 86.51 रुपये आणि डिझेल 79.21 रुपये प्रति लीटर
नोएडा- पेट्रोल 83.67 रुपये आणि डिझेल 74.29 रुपये प्रति लीटर
लखनऊ- पेट्रोल 83.59 रुपये आणि डिझेल 74.21 रुपये प्रति लीटर
पटना- पेट्रोल 86.25 रुपये आणि डिझेल 79.04 रुपये प्रति लीटर
चंदिगडः पेट्रोल 80.59 रुपये आणि डिझेल 73.61 रुपये प्रति लीटर
प्रत्येक दिवशी बदलतात इंधनाचे दर
प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता इंधनाच्या दरात बदल होत असतो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी (उत्पादन शुल्क), डिलर कमिशन आणि अन्य कर मिळून तेलाच्या किंमती या दुप्पट होत असतात.
प्रत्येक दिवशी बदलणारे दर पाहायचे कसे?
तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून ज्या त्या दिवसाचे नवीन दराचे अपडेट्स मिळवू शकता. इंडियन ऑयलच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, RSP च्यासोबत आपल्या शहराचा कोड टाइप करुन 9224992249 नंबर वर SMS करुन तुम्हाला इंधनाच्या दराची माहिती मिळवता येते. प्रत्येक शहराचा कोड हा वेगळा असतो.