भारतीय अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारणा; ‘एडीबी’चा अहवाल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

एशियन डेव्हलपमेंट बँकने (एडीबी) भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाज सुधारला आहे. विकास दर (जीडीपी) २०२०-२१ मध्ये उणे ८ टक्के राहण्याची शक्यता असल्याचे बँकेने म्हटले आहे. पूर्वी तो उणे ९ टक्के राहण्याचा अंदाज होता.

नवी दिल्ली - एशियन डेव्हलपमेंट बँकने (एडीबी) भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाज सुधारला आहे. विकास दर (जीडीपी) २०२०-२१ मध्ये उणे ८ टक्के राहण्याची शक्यता असल्याचे बँकेने म्हटले आहे. पूर्वी तो उणे ९ टक्के राहण्याचा अंदाज होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एडीबीने अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होत असल्याने विकास दरातही सुधारणेची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले, की दुसऱ्या तिमाहीत ७.५ टक्के घट ही अपेक्षेपेक्षा चांगली आहे. चालू आर्थिक वर्षातील जूनच्या तिमाहीत अर्थव्यवस्थेमध्ये २३.९ टक्क्यांनी घट झाली, हा कोरोना विषाणूच्या साथीचा परिणाम होता. 

‘सेन्सेक्स’च्या घोडदौडीला लगाम

आर्थिक वर्ष २०२१ च्या वाढीचा अंदाज ८.० टक्के आहे. अपेक्षेपेक्षा भारतात वेगवान सुधारणा असल्याचे ठळकपणे नमूद करताना अहवालात म्हटले आहे, की भारतासाठीचा अंदाज सुधारत असताना दक्षिण आशियातील अंदाज (-६.८) टक्क्यांवरून (- ६.१) टक्क्यांवर आला आहे. 

Gold-Silver prices: सोन्याच्या किमतींमध्ये घसरण, चांदीचे दरही गडगडले

अर्थव्यवस्था येणार पूर्वपदावर
एडीबीने अहवालात म्हटले आहे की, २०२१-२२ मध्ये विकास दर पूर्वपदावर येईल, जो दक्षिण आशियात ७.२ टक्के आणि भारतात ८ टक्के राहील. या महिन्याच्या सुरुवातीस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, की अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक वेगवान आहे आणि चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात विकास दर सकारात्मक होण्याची अपेक्षा आहे. दास यांनी आर्थिक धोरण आढावा बैठकीमध्ये म्हटले होते की, आपण वर्षभर पाहिले तर अर्थव्यवस्था उणे ७.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने आणि विकासदर उणे ९.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला होता.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian economy recovers faster than expected ADB report