esakal | झेन टेकचे शेअर्स फक्त 4 दिवसात तब्बल 60 टक्क्यांनी वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

झेन टेकचे शेअर्स फक्त 4 दिवसात तब्बल 60 टक्क्यांनी वाढले

झेन टेकचे शेअर्स फक्त 4 दिवसात तब्बल 60 टक्क्यांनी वाढले

sakal_logo
By
टीम इसकाळ

- शिल्पा गुजर

Zen Tech Stock Price: केंद्र सरकारने अलीकडेच ड्रोनशी संबंधित नियम कमी केले, ज्यामुळे झेन टेक्नॉलॉजीजचे शेअर्स प्रचंड वाढले. झेन टेकचे शेअर्स फक्त चार दिवसात 60 टक्क्यांनी वाढले आहेत. भारतात ड्रोन बनवणारी ही एकमेव लिस्टेड कंपनी असल्याने कंपनीचे शेअर्स वाढत राहतील अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे

हेही वाचा: जगभरात Charity Day साजरा करण्यामागचं कारण माहितीये?

झेन टेक्नॉलॉजीज ही कंपनी हैदराबाद स्थित आहे. कंपनीचे ऑर्डर बुक बघितले तर लक्षाते येते की कंपनीकडे सध्या भरपूर ऑर्डर आहेत. भविष्यात ई-कॉमर्स कंपन्या ड्रोनद्वारे होम डिलिव्हरी करतील याची मोठी शक्यता आहे. जर ई-कॉमर्स कंपन्यांनी ड्रोन वापरायला सुरुवात केली तर कंपनीचे शेअर्स अनेक पटींनी वाढू शकतात

झेन टेकला त्याच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले पाहिजे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. झेन टेकचे शेअर्स गेल्या एकाच आठवड्यात 50% पेक्षा जास्त वाढले आहेत, त्यामुळे नफा बुक केल्यानंतरच त्यात गुंतवणूक करणे योग्य ठरेल असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

झेन टेक ही भारतातील एकमेव लिस्टेड कंपनी आहे जी ड्रोन तयार करते. कंपनीकडे मजबूत ऑर्डर बुक आहे. कंपनीला नुकतीच 155 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे अशी माहिती प्रोफिटमार्ट सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख (Research head of Profitmart Securities) अविनाश गोरक्षकर यांनी दिली.

टेक्निकल चार्ट पाहिल्यास लक्षात येईल की झेन टेकमध्ये सध्या जोरदार तेजी बघायला मिळतेय. टेक्निकल चार्टवर हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होतो आहे जो तेजीचा संकेत आहे. कंपनीची रेझिस्टंस लेव्हल (Resistance Level) 158 रुपये आहे. कंपनीच्या शेअर्सने ही पातळी ओलांडल्यावर ते 200 ते 225 रुपयांपर्यंत जाऊ शकतात.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top