esakal | जगभरात Charity Day साजरा करण्यामागचं कारण माहितीये?
sakal

बोलून बातमी शोधा

International Day of Charity 2021

जगभरात Charity Day साजरा करण्यामागचं कारण माहितीये?

sakal_logo
By
सुशांत जाधव

International Day of Charity 2020: देशभरात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन (Teachers Day) म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या दिवसाला खास आणि विशेष महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय दान दिवस किंवा International Charity Day म्हणून जगभरात आजच्या दिवसाला महत्व आहे. हंगेरीत पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने 2012 मध्ये प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबरला अंतरराष्ट्रीय दान दिवस साजरा करण्याची घोषणा केली. गरजू लोकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. भारताचा विचार केल्यास पुरातन काळापासूनच दान धर्म करणे पुण्याचे मानले जाते.

आंतरराष्ट्रीय दान दिवसाचा इतिहास

भारतात प्राचीन काळापासून दान-धर्म ही एक प्रथा असल्याचे दिसते. अनेक ऐतिहासिक पुस्तकात याचे संदर्भही वाचायला मिळतात. मानवी जीवनात एखाद्याला मदत करणं हा मोठा धर्म मानला जातो. गरजू लोकांपर्यंत मदत कशी पोहचवता येईल याच उद्देशाने हंगेरीच्या संसदेत 2011 मध्ये एक विधेयक मांडण्यात आले होते. यात दान एकत्रित करण्याचा उल्लेख होता. या विधेयकाला एकमताने मंजुरीही मिळाली.

हेही वाचा: Teachers' Day 2021 : शिक्षक दिनाचे काय आहे महत्त्व आणि इतिहास?

यासाठी एका चॅरिटीचे आयोजन करण्यात आले. यात अनेक लोकांनी मनापासून सहभाग घेत आपापल्या परीने मदत दिली. या उपक्रमाला सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने 2012 पासून प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय International Charity Day साजरा करण्याची घोषणा केली.

हेही वाचा: Teachers Day 2021: या शिक्षक दिनी, हा नवीन ट्रेंड करा ट्राय

आंतरराष्ट्रीय दान दिवसाचे महत्त्व

आंतरराष्ट्रीय दान दिवसाचा उद्देश हा केवळ गरजू लोकांना मदत करणे आणि गरीबी कमी करण्याचा आहे. यासाठी यूनिसेफने एक खास संकल्पही केलाय. 2030 पर्यंत जग गरीबी मुक्त व्हायला हवं, असा उद्देश ठेवण्यात आलाय. जगभरात अनेक देशातील अवस्था ही बिकट आहे. समाजातील अशा गरीबांपर्यंत पोहचून त्यांना आवश्यक ती मदत करण्याच्या नैतिक जबाबदारीचे सर्वांनी भान ठेवणे अपेक्षित आहे.

loading image
go to top