‘झोमॅटो’च्या शेअरची बाजारात जोरदार ‘एंट्री’

झोमॅटोने एक लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलीमूल्याचा मोठा टप्पाही ओलांडला.
zomato
zomatosakal

मुंबई : विविध हॉटेलमधील खाद्यपदार्थ नागरिकांच्या घरापर्यंत पोचविण्याची सेवा देणाऱ्या झोमॅटो (zomato) या लोकप्रिय कंपनीच्या शेअरने आज मुंबई (mumbai) व राष्ट्रीय शेअर बाजारात (global stock market)) जोरदार ‘एंट्री’ केली. या कंपनीचा शेअर प्रत्यक्ष ऑफर किमतीपेक्षा तब्बल ५२ टक्क्यांच्या अधिक भावपातळीवर उघडला. त्यामुळे या कंपनीचे शेअर मिळालेले नशिबवान गुंतवणूकदार शेअर नोंदणीच्या पहिल्याच दिवशी मालामाल झाले. त्याचबरोबर कंपनीने एक लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलीमूल्याचा मोठा टप्पाही ओलांडला. (Zomato shares make strong market entry)

‘झोमॅटो’च्या प्राथमिक समभागविक्रीची (IPO) बाजारात जोरदार चर्चा होती. कंपनीचा इश्यू साईझ मोठा असूनही या ‘आयपीओ’ला गुंतवणूकदारांचा ३८ पटीहून अधिक प्रतिसाद मिळाला होता. कंपनीने प्रतिशेअर रु. ७६ ने शेअरवाटप केले होते. विशेष म्हणजे ‘आयपीओ’ बंद झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात हा शेअर आज बाजारात नोंदलाही गेला. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) हा शेअर आॅफर किमतीच्या ५२.६३ टक्के प्रीमियमसह रु. ११६ रुपयांवर उघडला, तर मुंबई शेअर बाजारात (बीएसई) तो ५१.३२ टक्के प्रीमियमसह रु. ११५ वर नोंदला गेला. बाजार बंद होताना तो अनुक्रमे रु. १२५.३० आणि रु. १२५.२० वर स्थिरावला.

zomato
ICSE, ISC Result : CISCE ने जाहीर केले दहावी, बारावीचे निकाल

‘झोमॅटो’ची सुरवात २०१० मध्ये तिचे प्रवर्तक दीपिंदर गोयल यांनी केली होती. गेल्या ११ वर्षांत कंपनीने हॉटेलमधील खाद्यपदार्थ घरपोच पोचविण्याच्या व्यवसायात स्वतःचे नाव प्रस्थापित केले. सध्याच्या कोरोना महासाथीच्या काळात तर तिच्या सेवेचे महत्त्व आणखी वाढल्याचे चित्र दिसत आहे. असे असूनही ही कंपनी अजूनही तोट्यात आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या ‘आयपीओ’ला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. आज झालेली नोंदणीदेखील ऐतिहासिक मानली जात आहे. नोंदणीच्या पहिल्याच दिवशी या कंपनीने एक लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलीमूल्याचा टप्पा पार केला. दमदार नोंदणीनंतर तिचे बाजारमूल्य रु. १,०८,०६७.३५ कोटींवर पोचले आहे.

zomato
मोठी घोषणा! तळीये गाव म्हाडा वसवणार - गृहनिर्माण मंत्री आव्हाड

‘झोमॅटो’चे बंपर लिस्टिंग

‘आयपीओ’ला प्रतिसाद : ३८ पटींहून अधिक

ऑफर किंमत : प्रतिशेअर रु. ७६

‘एनएसई’वर नोंदणी : रु. ११६

‘बीएसई’वर नोंदणी : रु. ११५

बाजार भांडवलीमूल्य : रु. १,०८,०६७.३५ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com