पर्वतकन्या

पर्वतकन्या

जगातील काही प्रमुख पर्वतांपैकी एक असलेल्या हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर लहक्‍पा यांनी तब्बल सात वेळा यशस्वीपणे पादाक्रांत केले. हा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या महिला गिर्यारोहक आहेत. एव्हरेस्ट शिखराची उंची 8 हजार 850 मीटर असून हे शिखर तिबेटच्या सीमारेषेवरून त्यांनी पार केले. हे शिखर सातव्यांदा सर करून त्यांनी स्वत:चेच जुने विक्रम मोडीत काढले आहेत.

आज जगाच्या कानाकोपऱ्यातील महिला आपले कौशल्य पणाला लावून यशाची शिखरे पार करत आहेत. यामध्ये आता आणखी एका महिलेचे नाव अभिमानाने पुन्हा एकदा घ्यावे लागेल ते म्हणजे लहक्‍पा शेर्पा. मूळच्या नेपाळच्या असलेल्या या 42 वर्षीय महिलेने है शौर्य दाखविले आहे.
जगातील काही प्रमुख पर्वतांपैकी एक असलेल्या हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर त्यानी तब्बल सात वेळा यशस्वीपणे पादाक्रांत केले. हा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या महिला गिर्यारोहक आहेत. एव्हरेस्ट शिखराची उंची 8 हजार 850 मीटर असून हे शिखर तिबेटच्या सीमारेषेवरून त्यांनी पार केले. हे शिखर सातव्यांदा सर करून त्यांनी स्वत:चेच जुने विक्रम मोडीत काढले आहेत. हे शिखर सर करणे ही सोपी गोष्ट नाही. भारताच्या किंवा इतर कोणाच्याही हद्दीतून ते पार करणे अधिकच अवघड आहे.

लहक्‍पा यांनी सर्वप्रथम सन 2000मध्ये एव्हरेस्ट शिखर सर केले होते, त्या वेळी त्या नेपाळमधील पहिल्या महिला गिर्यारोहक ठरल्या होत्या. सातव्यांदा विक्रम नोंदविला तेव्हा लेहक्‍पा 20 मे रोजी पहाटे पाच वाजता शिखरावर पोहोचल्याचे त्यांचे संयोजक राजीव श्रेष्ठा यांनी सांगितले.

लेहक्‍पा या सध्या अमेरिकेच्या नागरिक असून तेथील "सेव्हन इलेवन‘ नावाच्या एका दुकानात त्या कॅशियरची नोकरी करतात. घर आणि दोन मुलींची जबाबदारी सांभाळून असे स्वप्न पाहणे आणि ते प्रत्यक्षात उतरवणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. हे शिखर पाच वेळा सर केल्याची या आधीची नोंद आहे, त्यामुळे लेहक्‍पा यांनी सहाव्यांदा शिखर सर केल्यानंतर गिनिज बुकमध्ये त्याची नोंद झाली. या वर्षी त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडीत काढत नवा जागतिक विक्रम नोंदवला आहे.
 
नेपाळमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मकालू गावात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. येथे त्यांच्या आई-वडिलांचे एक चहाचे दुकान आहे. हिमालयाच्या कुशीतच त्या वाढल्याने नेहमीच शिखरावर जायची त्यांना ओढ असे. शेर्पा कुटुंब हे पर्वतारोहणासाठीच ओळखले जाते. लेहक्‍पा यांच्या कुटुंबात एकूण अकरा भावंडे आहेत. आठ बहिणींचा सहवास असतानाही लेहक्‍पा मुलासारख्या वाढल्या. बालपणापासूनच त्या"टॉम बॉय‘ वर्गात मोडणाऱ्या होत्या. सर्वसामान्यांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची त्यांची इच्छा ही पर्वतारोहणाच्या विक्रमांवरून दिसून येतेच. "शाळेत असल्यापासूनच लेहक्‍पा कुठलीच गोष्ट मुलींसारखी करत नव्हती. सामान्य मुलींसारखे हट्ट, वर्तन ती करायची नाही,‘ अशा आठवणी त्यांच्या मामाने व्यक्त केल्या. शेर्पा कुटुंबीय हे पर्वतारोहणासाठी लोकप्रिय असल्याने लहानपणापासून त्यांना हे बाळकडू मिळत गेले. वयाच्या 15व्या वर्षापासून पर्वतारोहणाचे साहित्य पाठीवर घेऊन त्यांच्या काकांसोबत मकालूच्या उंच शिखरावर त्या जात असत. या शिखरांवर जाताना लेहक्‍पा स्लिपिंग बॅग, खाण्याचे साहित्य, पर्वतारोहणाचे साहित्य असे एकूण 15 ते 25 किलोचे साहित्य घेऊन बर्फातून चढत असत. त्यांचे भाऊ मिन्ग्मा आणि गेलू शेर्पा यांनीही तब्बल आठवेळा एव्हरेस्ट शिखर सर केले आहे.

पर्वतारोहण करताना हवामानाचा अचूक अंदाज बांधणे शक्‍य नसते, मात्र त्या वेळी आलेल्या प्रत्येक वादळातून स्वत:चा बचाव करत कसे उभे राहावे, हे लहक्‍पा यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. प्रत्यक्ष जीवनातही आलेल्या संकटावर मात करत त्या पुढे गेल्या. घरगुती हिंसाचाराला बळी पडल्यानंतर बारा वर्षांनी घटस्फोट घेत दोन मुलींच्या हक्कासाठी त्यांना झगडावे लागले. सध्या त्या दोन मुली आणि तिसरा मुलगा यांच्यासोबत अमेरिकेत राहत आहेत.
पर्वतारोहण करताना दुखापत ही ठरलेली आहे. सहाव्यांदा शिखर सर करताना दोन दगडांमध्ये अडकल्याने डाव्या मांडीच्या हाडाला दुखापत झाली होती. ही झीज भरून काढत यंदा सातव्यावेळी त्यांनी यशस्वी चढाई केली. सहाव्या चढाईपूर्वी त्या दोन आठवडे भारतीय सैन्यांकडे प्रशिक्षण घेत होत्या. त्यांच्या या डोंगराएवढ्या यशाची दखल कोणी घेतली नाही. लहक्‍पा यांचा स्वभाव मुळातच शांत आहे. प्रत्येक क्षेत्रात असलेल्या राजकारणामुळे लहक्‍पा या नेहमीच दुर्लक्षित राहिल्या. मात्र या गोष्टीचा परिणाम कधीही आपल्या कार्यावर होऊ दिला नाही.
लहक्‍पा यांच्या यशावर आधारित रमयता लिंबूनिर्मित "डॉटर्स ऑफ एव्हरेस्ट‘ नावाचा एक लघुपट केला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com