अमेरिकी कादंबरीतल्या नटसम्राटाची कथा

मयूर देवकर
बुधवार, 6 जून 2018

दाेन अाठवड्यांपूर्वी (२२ मे) प्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार फिलिप राॅथ यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन आणि त्यांच्याशी असलेली अर्धवट ओळख वाढविण्याकरिता त्यांची पुस्तकं वाचायचे ठरवले. सुरवात म्हणून "द हम्बलिंग' हाती घेतली. १४० पानांची ही छोटेखानी कादंबरी. 

उतारवयात शारीरिक अाणि मानसिक मर्यादांमुळे येणाऱ्या नैराश्यामुळे अात्महत्येकडे वळण्याची मानसिकता या कांदबरीचा एक प्रमुख विषय. यातील पात्रं अात्महत्येविषयी अत्यंत अात्मयीतेने बाेलतात. सर्वस्व गमावल्यानंतर किंवा गमावलेले परत मिळण्याची शक्यता नाहिशी झाल्यानंतर स्वतःच्या हाताने जीवनाचा अंत करणे म्हणजे जीवनाला नाट्यमय कलाटणी देेणे मानतात. अशीच कलाटणी सायमन अॅक्झलर देऊ पाहताेय. 

वयाची साठी ओलांडलेला सायमन म्हणजे अमेरिकन रंगभूमीवरील नटसम्राट. अभिजात रंगकर्मींच्या शेवटच्या पीढीतील अग्रणी कलावंत. उतारवयात 'अभिनयाची' दैवी देणगी गमावून बसल्यावर रंगभूमीवरील कारकीर्द संपल्यात जमा झाली, याची त्याला स्पष्ट जाणीव होते. त्याला नैराश्य येते. अशा परिस्थितीत त्याची बायकाे २० वर्षांचा संसार माेडून निघून जाते. यामुळे अाणखी नैराश्‍याच्या गर्तेत बुडून जाताे. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोंघावू लागतात - पोटमाळ्यावर ठेवलेली बंदूक घ्यावी आणि करावी एकदाच या सगळ्यामधून सुटका! पण, तो तसे कारात नाही. स्वतःहून मनोविकार रुग्णालयात भरती होतो. 

तेथे २६ दिवसांच्या मुक्कामामध्ये त्याची भेट त्याच्यासारखेच नैराश्य अाणि अात्महत्येच्या  विचारांनीग्रस्त रुग्णांशी हाेते. त्यांपैकी सिबिल वॅन ब्युरेनशी त्याची चांगली मैत्री हाेते. सिबिलचा दुसरा नवरा तिच्या सात वर्षांच्या मुलीचे लैंगिक शाेषण करताे, असे तिला वाटत असते.  त्याला जाब विचारण्याएेवजी किंवा पाेलिसांकडे जाण्याएेवजी ती मनातल्या मनात स्वतःलाच छळत बसते. डाेक्यात शंकाकुशंकाचे काहूर माजवते. त्यामुळे मानसिक स्थिती खालावल्याने तिची रवानगी या रुग्णालयात केली जाते. येथे सायमनशी ती सर्व मनमाेकळे बाेलते.  त्याला तिच्या नवऱ्याचा खून करण्याविषयीदेखील विचारते. पण, ताे तिला लवकर बरी हाेऊन मुलीपाशी जाण्याचा सल्ला देताे. ( काही  महिन्यांनंतर ती स्वतः नव खून करते.)

रुग्णालयातून सुटी झाल्यावर सायमन एकटाच राहू लागतो. गरजेपयाेगी सामान  खरेदीशिवाय ताे सहसा बाहेर पडत नाही. त्याचा एजंट जेरी अाेपनहेम त्याला रंगभूमीवर परतण्याची गळ घालताे. पण 'मी अाता संपलाे' असं स्पष्टपणे कबूल करून ताे नकार देताे. 

एकेदिवशी त्याच्या घरी पिजीन माईक येते. पिजीन म्हणजे त्याच्या तरुणपाणातील मित्र व सहकलाकार जोडप्याची चाळीसवर्षीय लेस्बियन मुलगी. सहा वर्षांपासून पिजीन एका मुलीसोबत रिलेशिनशिपमध्ये असते. मात्र, तिची प्रेयसी शस्त्रक्रिया करून 'पुरुष' होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे नाते संपुष्टात येते. मग पिजीन एका विद्यापीठाच्या महिला डीनला (लुईस रेनर) प्रेमात पाडून नाेकरी मिळवते.

त्याच भागात सायमनही राहत असल्यामुळे पिजीनचे त्याच्या घरी येणे-जाणे सुरू होते आणि दोघे प्रेमात पडतात. सायमन एखाद्या नवतरुणाप्रमाणे तिचे 'लाड' पुरवू लागतो. बऱ्याच काळानंतर त्याचे मन कुठे तरी रमू लागते. परंतु, या दोघांचे नाते पिजीनच्या आईवडिलांना तितकेसे रुचत नाही. दोघांच्या वयात २५ वर्षांचे अंतर. आपल्या मुलीने आयुष्यात प्रथमच पुरुषांमध्ये रस दाखविल्यानंतर तिने असा उतारवयातील नैराश्‍यपीडित 'हारलेला' माणूस पसंत करावा, आणि तोदेखील त्यांचा मित्र, हे काही त्यांच्या पचनी पडणारे नव्हते. तिची अाई तर तिला स्पष्ट म्हणते की, वर्षांगणिक ताे अाणखी म्हातारा हाेत जाणार आहे. प्रेमाचा अानंद लुटण्याएेवजी तुला त्याचे अाजारपण काढण्यातच अायुष्य घालावे लागेल.

पण सायमनला याची काही फिकीर नव्हती. पिजीनसाेबत ताे नव्याने अायुष्याचा अानंद उपभाेगत हाेता. फिलिप राॅथ त्यांच्या लैंगिक जीवनाचे वर्णन अत्यंत कामूकपद्धतीने करतात. मग ते पाठीच्या दुखण्यामुळे पिजीनला वुमेन अाॅन टाॅप शिकवणे असाे किंवा सेक्स टाॅईजचा वापर असाे, सेक्शुअल फॅंटसी आणि अॅडव्हेंचरचा पुरेपूर वापर येथे करण्यात आला अाहे. दाेघांनाही थ्री-समची इच्छा असते. म्हणून मग ते ट्रेसी नावाच्या एका विवाहितेला त्यांच्या कामक्रीडेमध्ये सामील करून घेतात.

वयाच्या २३व्या वर्षी पिजीनने स्वतःला लेस्बियन म्हणून स्वीकारलं. अाईवडिलांची नाराजी सहन करून स्वतःच्या मनाप्रमाणे, स्वतःच्या अटीवर अायुष्य जगणारी ती स्वावलंबी मुलगी. मात्र, प्रेयसीने पुरुष हाेण्याचा निर्णय घेतल्याने ती निराश हाेते. अशा अवस्थेत सायमनची साेबत तिला अाधार देणारी ठरते. त्यामुळे त्याचं वय तिच्या लेखी काही महत्त्वाचं नाही. तसेच पुरुषाचा सहवास ती प्रथमच अनुभवत असल्यामुळे तीसुद्धा तिच्या लैंगिकतेच्या शक्यता अाण प्रयाेग करू पाहते. 

लेस्बियन असूनही पिजीन इतक्या उत्कटतेने अापल्या प्रेमात पडली याचे सायमनला खूप समाधान वाटू लागते. स्वतःच्या पाैरुषत्वाविषयी त्याचा अभिमान वाढताे. अापला गमावलेला सूर पिजीनच मिळवून देऊ शकते, पुन्हा अभिनयदेखील करू शकतो, असे त्याला वाटू लागतं. एवढंच नाही तर तो या वयातही वडील होण्याचे स्वप्न पाहू लागतो. त्यासाठी दवाखान्यात जाऊन वृद्धापकाळात बाप होण्याविषयी माहितीसुद्धा घेतो. त्याच्यादृष्टीने असं सगळं सुरळीत सुरू असताना एकेदिवशी पिजीन त्याच्यासोबतचं नातं तोडून टाकते. 

ट्रेसीसाेबत शरीरसुखाचा अनुभव घेतल्यांनंतर तिली कळून चुकते की, ती कधी पुरुषाच्या प्रेमात पडू शकत नाही. तसेच ''अभिनय करण्याचा आत्मविश्‍वास गमावलेल्याने निर्माण झालेली पोकळी भरण्यासाठी तू माझा वापर करत असल्याचाही'' ती त्याच्यावर आरोप करत ''हे नातं माझी सर्वात माेठी चूक हाेती'', असे सांगते, प्रेमविरहाच्या दुःखाने वेडावलेल्या नायकासारखा ताे काेसळून पडताे. आयुष्याच्या नव्या पहाटेचे स्वप्न पाहणाऱ्या सायमनला हा धक्का सहन होत नाही. 

या क्षणाला  त्याला अनेक महान नाटकांची (उदा. डेथ अाॅफ अ सेल्समन, अाॅल माय सन्स, अाॅथेलाे, अाॅल माय सन्स, मिस जुली, अवेक अॅंड सिंग, अॅंटनी अॅंड क्लिआेपेट्रा...) उदाहरणे दिसू लागतात ज्यामध्ये पात्रं अात्महत्या करतात. अापणही त्याप्रमाणे शेवट करावा, अशी त्याची सुप्त इच्छा असते. पिजीनच्या जाण्याने ताे अायुष्याला पुन्हा अाकार देण्याची संधी गमावून बसताे. 

नवनिर्मितीच्या उंबरठ्यावर येऊन प्रवेश नाकारण्यात यावा, तसे पिजीन त्याला साेडून जाते. टॅलेंट, संसार, प्रतिष्ठा, इच्छा, अात्मविश्वास गामावून बसल्यावर अायुष्यात फारसं काही उरलेलं नाही, असं त्याला वाटू लागतं. अात्महत्या करण्यासाठी त्याला प्रबळ कारणही मिळते. सायमनच्या म्हणन्याप्रमाणे,  “अात्महत्या ही जीवनातील स्वरचित भूमिका असते”. आणि ती पार पाडण्यासाठी  त्याला सिबिल प्रेरणा देते. जर सिबिलसारखी मुलगी खून करण्याइतपत हिंमत करू शकते तर मी किमान स्वतःचा जीव घेऊच शकताे. ''ती करू शकते तर मी पण करून शकाताे'', असं स्वतःला सांगू लागताे. त्याच्या अायुष्यात अालेल्या तिन्ही मुली (बायकाे, सिबिल अाणि अाता पिजीन) त्याल अात्महत्येपाशी जाण्यास भाग पाडतात. 

त्याला त्याचे अायुष्य अॅंटन चेकाव्हच्या दि सीगल नाटकातील नायकाच्या समांतर वाटू लागते. याच नाटकातील भूमिकेने त्याला प्रकाशझाेतात अाणले हाेेते. त्यातील काॅन्स्टॅंटिन गॅव्रिलाेव्हिच ट्रिएप्लिव्हप्रमाणे ताे स्वतःवर गाेळी झाडून एक्झीट घेताे. त्याच्या मृतदेहापाशी एका चिठ्ठित या नाटकातील शेवटची अाेळ लिहिलेली असतेः ''वास्तव हेच अाहे की, काॅन्स्टॅंटिन गॅव्रिलाेव्हिच ने स्वतःला गाेळी मारली हाेती.''

इतर ब्लॉग्स