β तुम्हाला माहिती आहे 'इमोजी'बद्दल काही?

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

स्मार्ट फोनच्या युगात मजकूर पाठविण्यापेक्षा चित्रमय संभाषणालाच अधिक महत्त्व आहे. चॅट करत असताना आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या मनात उमटलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला शब्दांचा आधार घ्यावा लागतो. मात्र वेगाने चॅट करत असताना मनातील नेमक्‍या भावना शब्दांत टिपणे प्रत्येकवेळी शक्‍य होईल किंवा नेमक्‍या भावना व्यक्त होतील असे नाही. या सर्वांवर मात करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरील भाव किंवा मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी "इमोटीकॉन्स‘ किंवा "इमोजी‘चा वापर करण्यात येतो.

स्मार्ट फोनच्या युगात मजकूर पाठविण्यापेक्षा चित्रमय संभाषणालाच अधिक महत्त्व आहे. चॅट करत असताना आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या मनात उमटलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला शब्दांचा आधार घ्यावा लागतो. मात्र वेगाने चॅट करत असताना मनातील नेमक्‍या भावना शब्दांत टिपणे प्रत्येकवेळी शक्‍य होईल किंवा नेमक्‍या भावना व्यक्त होतील असे नाही. या सर्वांवर मात करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरील भाव किंवा मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी "इमोटीकॉन्स‘ किंवा "इमोजी‘चा वापर करण्यात येतो. अलिकडे तर स्मार्ट फोनवर टेक्‍स्टिंग करताना आपण सातत्याने वापरत असलेले इमोजी संवादाचा अविभाज्य अंग बनले आहेत.

ऑक्‍स फर्डने 2015 मध्ये "इमोजी‘ या शब्दाचा आपल्या शब्दकोशात समावेश केला असून, सर्वांत लोकप्रिय इमोजी म्हणून "फेस विथ टिअर्स ऑफ जॉय‘ हा ठरला आहे. फेसबुकनेही नकारात्मक पोस्टवर व्यक्त होण्यासाठी काही नवे इमोटीकॉन्स प्रदर्शित केले आहेत.

इमोजी म्हणजे काय?
ऑनलाइन संवादादरम्यान एखादी वस्तू, स्थळ, हवामानाची स्थिती,चेहऱ्यावरील हावभाव आदी मांडणारे चित्र म्हणजे इमोजी. शब्दां ऐवजी चेहऱ्यावरील भावना प्रदर्शित करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा भावना दाखवण्याचा हा प्रभावी आणि लोकप्रिय मार्ग समजला जातो.

पहिला इमोजी

 • आपल्या भाव-भावनांचा व्हर्च्युअल आविष्कार म्हणजे इमोजी. ते फार जुने नक्कीच नाहीत. जपानमधील मोबाईल फोन वापरणाऱ्यांनी 1999 मध्ये शब्दांतून संभाषण करताना काही चित्ररूप मेसेज पाठवण्यास सुरवात केली.
 • यातूनच चित्ररूप संभाषणाची पद्धत रूढ झाली. चित्ररूप संभाषणाची प्रमाण वाढताच जपानमधील एका मोबाईल
 • कंपनीतील अभियंत्यांनी त्यावर संशोधन सुरू केले.
 • डोकोमो या कंपनीने सर्वप्रथम "आय मोड‘ नावाची सुविधा देऊन युजर्स ना त्यांच्या भावना चित्रात व्यक्त करण्याची संधी उपलब्ध
 • करून दिली. 

व्हॉट्‌स ऍपवर इमोजींची खैरात

 • व्हॉट्‌स ऍपने आपल्या नव्या आवृत्तीमध्ये धमाल इमोजी सादर केल्या आहेत.
 • यामध्ये फिरणारे डोळे, काल्पनिक घोडा, पॉपकॉर्न बॉक्‍स आदींचा समावेश.
 • इमोजींच्या प्रकारानुसार विभागणी - फूड, स्पोर्टस, ऍक्‍टिव्हिटीज आदी नवे विभाग.

फेसबुकवर वाईट पोस्टवर नाराजी व्यक्त करण्यासाठी नव्या इमोजी दाखल. डिसलाइकचे बटण देण्याची युजर्स ची मागणी काही अंशी पूवाने हे इमोटिकॉन्स आहेत. लाइक बटणावर क्‍लिक किंवा टॅप करून होल्ड केल्यास "रिऍक्‍शन‘ लोड होतील. त्यानंतर इमोटिकॉन्स पोस्ट करता येतील. फेसबुकने या इमोटिकॉन्सची सहा देशांत चाचणी घेतली. याय (yay) या इमोटिकॉन्सचा अर्थ न समजल्याने तो वापरला गेला नसल्याने यादीतून गच्छंती.

इमोजीचे प्रकार

 • स्माइली फेसेस
 • लाल चेहऱ्याचा माणूस
 • हार्टस
 • विविध हातवारे
 • वास्तू
 • ध्वज
 • निसर्ग
 • वस्तू व पदार्थ
 • सिम्बॉल
 • स्कीनटोन
 • स्थळ
 • बाण

इमोजी आणि इमोटिकॉन्स मधील फरक

 • इमोशन + ×ऍक्‍टिव्हिटी. (उदा. डान्सिंग गर्ल ) त्याचे कोड
 • हे संगणक तयार करतो आणि त्याचे चित्रात रूपांतर होते. ते आपल्याला दिसते.
 • जपानी भाषेत पिक्‍चर वर्ल्ड ला पिक्‍टो ग्राफ्स आणि इमोजी म्हणतात.
 • यामध्ये चेहरे, वातावरण, भाव-भावना, ऍक्‍टिव्हिटी यांचा समावेश होतो. ती टेक्‍स्ट आणि इ-मेल मेसेजमध्ये सेट केलेली असतात.
 • डोकोमो कंपनीने आयमोड नावाने इमोजी बाजारात आणले. याचा उपयोग वेबसेवा, इ-मेल आणि सर्व मोबाईल फोनवर उपलब्ध करून दिला.

इमोजीचे फायदे

 • व्यक्तिगत संभाषणात गुप्तता राहते. सुरक्षितपणे तुम्ही टाइप करू शकता.
 • टाइप करताना शब्द नसल्याने चुका टळतात.
 • तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी अनेक शब्दां ऐवजी एक इमोजी पुरतो.
 • विविध ऍप्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इमोजीचा समावेश असतो.
 • इमोजी टाइप करायला खूप कमी वेळ जातो.

करिअर : मोबाईल क्रांतीमुळे इमोजीचा प्रसारही मोठ्या प्रमाणात होत आहे. परदेशातील विविध कलाकार आणखी काही नव्या इमोजी रेखाटून त्या पेटंटसाठी दाखल करत आहेत. विविध काल्पनिक कार्टून व्यक्तीरेखा तुम्ही रेखाटत असाल तर काही नवे इमोजी रेखाटून या क्षेत्रात पाऊल ठेवू शकता. तुमचा इमोजी खरोखरी युनिक असल्यास ते पेटंट घेण्यासाठी दाखल करू शकता.

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या