सामुदायिक ज्ञानेश्‍वरी पारायणाचे 'जनक' 

FB_IMG_15456594809317070.jpg
FB_IMG_15456594809317070.jpg

अध्यात्म आणि विज्ञान यांत अनेकजण गोंधळ करतात. आमचे भाग्य एवढेच की मी आणि माझी भावंडे वारकरी संप्रदायाचा लौकिक असणाऱ्या घरात जन्मलो. आमच्या आई-वडिलांनी व बाबाआजोबांनी (आईचे वडिल) आम्हाला संतुलीत विचार करण्याची सवय लावली. आजोबांना आम्ही "बाबा' म्हणत असे. पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळूकर असे त्यांचे नाव. यावर्षी 27 डिसेंबरला त्यांना स्वर्गवासी होऊन 13 वर्षे झालीत. संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्रात सामुदायिक ज्ञानेश्‍वरी पारायणाचे जनक म्हणजे आमचे बाबा. साताऱ्यातील वेळू या छोट्या गावांत 1931 साली त्यांचा जन्म झाला, स्वातंत्र्यलढ्यातील सहभागासह भूमीगत चळवळीतील कार्यकर्त्यांना जेवणाचे डबे पुरविण्याची सेवा ते देत होते. 1951 मध्ये देवद्‍रीचे काशीभारती महाराजांनी बाबांना 'ज्ञानेश्‍वरी'च्या प्रसारासाठी दिलेल्या दिक्षेनंतरचे पहिलेच पारायण 1960 साली एकंबे येथे झाले. बघता-बघता पारायणांच्या माध्यमातून आमचे बाबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.

साताऱ्यात त्यांनी दारुबंदी अधिकारी म्हणून काम पाहिले, यशवंतराव चव्हाण यांनी बाबांच्या कार्याचे कौतुक केले. आण्णासाहेब शिंदेंच्या मदतीने बाबांच्या पारायणाचे दिल्लीत आयोजनही करण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसेन, उपराष्ट्रपती बी.डी.सी.,तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधी यांसह 55 खासदारांनी बाबांच्या कार्यास प्रोत्साहन देऊन संदर्भासाठी "ज्ञानेश्‍वरी' स्वतःजवळ ठेवल्या. वि. स. पागे, आप्पासाहेब पवार, अण्णासाहेब शिंदे, वसंतदादा पाटील, शरदचंद्रजी पवार, बाबासाहेब पुरंदरे, उल्हासदादा धुंडा महाराज देगलुटकर, गगनगिरी महाराज, परमहंस स्वामी माधवनाथजी, निवृत्ती महाराज देशमुख, इंद्रजित देशमुख, विश्‍वनाथजी कराड, सरलताई बाबर, शरद भाई अशा अनेक व्यंक्तींशी बाबांचे स्नेहमय संबंध होते. प्रा. शिवाजीराव भोसले यांनी बाबांचे वर्णन अत्यंत समर्पक शब्दात केले आहे, "पुंडलिक महाराजांचे वेगळेपण असे की त्यांनी विठूच्या राज्यात आपली वतनदारी निर्माण केली नाही, तर ते पायरीचे चिरे म्हणूनच जगले''. विनोबाजींनी बाबांच्या एका किर्तनात टाळ घेऊन नृत्य केले होते हे विशेष. संत तुकडोजी महाराजांची आणि बाबांची भेट सज्जनगडावर झाली होती, दरम्यान बाबांच्या पारायणाला त्यांनी सदिच्छा दिल्या होत्या.

किर्तनातून व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, शिक्षण प्रसारासह अनेक समाजप्रबोधनाचे संदेश त्यांनी दिले. सांस्कृतिक वारसा जपत तो पुढच्या पिढीपर्यंत पोचवला, बाबांच्या छत्रछायेखाली अनेक संसार मार्गी लागले. स्वच्छ आचरणाचे आणि सुंदर विचारांचे आमचे बाबा व्यसन, फॅशन आणि दूरदर्शनपासून नेहमीच दूर राहिले. त्यांची "नात' या नात्याने त्यांच्या शिकवणींना गाठीशी घेऊन मी माझ्या सरकारी नोकरीत बाबांच्या आशिर्वादांच्या साहायाने समाजपुरक गोष्टींना प्राधान्य देईन आणि बाबांचे नाव अजरामर ठेवीन...हे नक्की ! 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com