LokSabha 2019 : भाजपचा सुंठे वाचून खोकला गेला... 

सचिन बडे 
मंगळवार, 12 मार्च 2019

नगर दक्षिणचे भाजपचे विद्यमान खासदार यांना भाजपमधील स्थानिक नेत आणि आमदारांचा विरोध आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे प्रताप ढाकणे यांनी उघड विरोध केला होता. त्यांच्या या उघड विरोधाला भाजपच्या आमदारांचा छुपा पाठिंबा होता. मात्र, त्यावेळी गांधी यांनी दिल्लीतील वजन वापरून तिकीट मिळवले होते. त्यामुळे नाइलाजाने ढाकणे यांना पक्ष सोडावा लागला. तर, आमदारांना बळच प्रचार करावा लागला होता. गेल्यावेळेची परिस्थिती पुन्हा होऊ नये यासाठी भाजपने गांधी यांना पर्याय शोधण्यास अगोदरच सुरवात केली होती.

पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री यांच्या उपस्थिती भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह ज्येष्ठ मंत्री आणि नगर दक्षिणमधील भाजपचे सर्व आमदार, पक्षपदाधिकारी उपस्थित होते. मात्र, विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होती. भाजपही गांधींना पर्याय शोधत होते. त्यातच सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपचा सुंठे वाचून खोकला गेला. असे चित्र आहे.

नगर दक्षिणचे भाजपचे विद्यमान खासदार यांना भाजपमधील स्थानिक नेत आणि आमदारांचा विरोध आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे प्रताप ढाकणे यांनी उघड विरोध केला होता. त्यांच्या या उघड विरोधाला भाजपच्या आमदारांचा छुपा पाठिंबा होता. मात्र, त्यावेळी गांधी यांनी दिल्लीतील वजन वापरून तिकीट मिळवले होते. त्यामुळे नाइलाजाने ढाकणे यांना पक्ष सोडावा लागला. तर, आमदारांना बळच प्रचार करावा लागला होता. गेल्यावेळेची परिस्थिती पुन्हा होऊ नये यासाठी भाजपने गांधी यांना पर्याय शोधण्यास अगोदरच सुरवात केली होती. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी भाजप प्रयत्न करत होते. परंतु खुद्द शिंदेची तयारी नव्हती. त्यामुळे भाजपसमोर उमेदवाराचा प्रश्‍न पडला होता. त्यातच सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपला सक्षम उमेदवार तर, मिळालाच आणि गांधींचा पत्ताही कट करता येणार आहे.

सुजय विखे हे गेल्या दोन वर्षापासून नगर दक्षिणमध्ये बस्तान बांधून आहेत. प्रत्येक तालुक्‍यात तरुण कार्यकर्त्यांचे जाळे त्यांनी तयार केले आहे. नगर दक्षिणेची लोकसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेस पक्षाला सोडण्यासाठी त्यांच्या पित्यांनी प्रयत्नही केले. मात्र, शरद पवारांनी ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने राधाकृष्ण विखेंचे दिल्ली तंत्र अपयशी ठरले. मतदार संघामध्ये गांधी यांचा नसलेला जनसंपर्क, पक्षातील पकड, कार्यकर्त्यांची नाराजी, अशा अनेक कारणामुळे गांधींना पुन्हा तिकीट देण्यास भाजप इच्छुक नव्हते. गेल्या निवडणुकीमध्येही हीच परिस्थिती होती. मतदारसंघात पक्षाला गांधी यांना दुसरा सक्षम पर्याय नसल्याने पंचाईत झालेली होती. यावर उपाय शोधत असतानाच सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपचा सुंठे विना खोकला गेला आहे. विखेंच्या पक्षप्रवेश भाजपसाठी अनेक अंगी महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा फायदा नगरच्या दोन्ही मतदारसंघात भाजपला होणार आहे. 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या