अन्‌ अशी चमकली 'लाव रे तो व्हिडिओ'ची टीम

अन्‌ अशी चमकली 'लाव रे तो व्हिडिओ'ची टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 'लाव रे तो व्हिडिओ' हा डायलॉग महाराष्ट्रभर चर्चिला जातोय. राजकीय सभेत पुराव्यांसह विरोधकांवर तुटून पडताना त्यांनी एलईडी स्क्रीनचा वापर आपल्या भाषणात खुबीने केला. त्यांना ऐकायला येणाऱ्यांनाही ते पचनी पडत असून नुसते "लाव रे..' म्हटले तरी लोकांच्या टाळ्या, शिट्या वाजायला सुरु होतायत. अखेर पडद्यामागचे कलाकार काल पुण्यातील सभेदरम्यान समोर आलेच. त्याला कारणही तसेच होते. राज ठाकरेंचे भाषण लाईव्ह सुरु असताना "मनसे अधिकृत' या फेसबुक पेजवर ते चमकले. ते चेहरे आहेत तरी कोण? हे व्हिडिओ "रिप्ले' करत पाहण्याचा मोह लोकांना होत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधाची कमान राज ठाकरेंनी स्वत:च खांद्यावर घेतली आहे. एकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे "स्टार' प्रचारक आपल्या उमेदवारासाठी भाषणे करत असताना राज ठाकरेंनी मात्र, आपला करिष्मा टिकवून ठेवला आहे. त्यांच्या सभा याची साक्ष देत आहेत. मुंबईमध्ये गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर झालेली पहिली सभा असो किंवा त्यानंतर नांदेड, सोलापुर, इचलकरंजी, सातारा, पुणे याठिकाणी झालेल्या सभा असोत. प्रमुख आकर्षण ठरत आहे ते म्हणजे, व्यासपीठावर लावलेल्या भव्य एलईडी स्क्रीन. एवढेच काय तर, सभेपूर्वीच रिकाम्या स्क्रीनचे फोटो सोशल मीडियात झळकत आहेत. इथे आज काय दाखवणार? कुणाचा नंबर लागणार? अशी उत्कंठा वाढवली जातेय. एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून मोदी आणि शहा आधी काय बोलले, आता काय बोलतायत आणि त्याचे परिणाम काय होतायत. यासंदर्भात प्रत्येक सभेत किमान पाच-सात व्हिडिओ दाखवण्यात येत आहेत. यातील काही व्हिडिओ वारंवार दाखवणार असल्याचे त्यांनी पहिल्याच सभेत सांगितलेय. आलटून-पालटून वेगवेगळ्या सभेत व्हिडिओ वापरले जात आहेत. 

पुण्यातील सभेत काश्‍मिरमधील नरेंद्र मोदी यांचे वक्‍तव्य आणि त्यानंतर सैनिकांना झालेला त्रास याबद्दल राज ठाकरे बोलत असताना मनसे नेते अनिल शिदोरे यांनी चिठ्ठी आणून दिली. भाषणाच्या नादात चिठ्ठी पाहिलीच नाही. त्यामुळे "लाव रे तो व्हिडिओ..' असे म्हटल्यानंतरही व्हिडिओ लागला नाही. शिदोरेंनी पुन्हा राज ठाकरे यांच्या जवळ येत आजच्या शेड्युलमध्ये तो व्हिडिओ नसल्याचे सांगितले. दरम्यानच्या काळात व्हिडिओ लावणारी टीम फेसबुक लाईव्हमध्ये चमकली. ठीक आहे म्हणत, राज ठाकरे यांनी व्हिडिओतील बाबी तोंडी सांगत विषय पुढे नेला. अवघ्या काही सेकंदातच पुन्हा राज ठाकरेंना हवे असलेले व्हिडिओ स्क्रीनवर झळकल्याने पुन्हा शिट्ट्या वाजू लागल्या. भाषण थांबवत दोन्ही व्हिडिओ दाखवले गेले. भाषण थांबवून स्क्रीनकडे हात करुन केलेला इशारा आणि तत्काळ झळकणारे व्हिडिओ यामुळे दोघांमधील ट्युनिंगही चर्चेचा मुद्दा ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com