कारणराजकारण: पुणेकरांची आर्त हाक कोणाला ऐकू येणार

प्रणिता मारणे
Monday, 22 April 2019

जुन्या भिंती.. मोठे दरवाजे.. ऐटदार घरे. असा मूळ पुण्याचा म्हणजेच कसब्याचा दिमाख असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत.. एकेकाळी राहतं घर ही शान होती..पण आता तिथेच रोज जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे. कारण मूळ प्रश्नांकडे कधी कोणी लक्षच दिले नाही. पालक मंत्र्यांचं ऑफिस हाकेच्या अंतरावर आहे पण पुणेकरांची आर्त हाक कधी त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही.
 

जुन्या भिंती.. मोठे दरवाजे.. ऐटदार घरे. असा मूळ पुण्याचा म्हणजेच कसब्याचा दिमाख असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत.. एकेकाळी राहतं घर ही शान होती..पण आता तिथेच रोज जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे. कारण मूळ प्रश्नांकडे कधी कोणी लक्षच दिले नाही. पालक मंत्र्यांचं ऑफिस हाकेच्या अंतरावर आहे पण पुणेकरांची आर्त हाक कधी त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही.

कारणराजकारण'च्या निमित्ताने का होईना मी या वाड्यांकडे सामाजिक प्रश्न म्हणून पाहायला लागले. माझे आजोळ कसबा गणपतीच्या पुढे त्यामुळे या वाड्यांशी जवळचा संबंध. पण आपल्याबरोबर या वास्तूंचेही वय वाढत आहे, याची कल्पनाच केली नव्हती. यानिमित्ताने त्याचेही म्हणणे ऐकून घेतले. 49 वर्षांच्या आजीबाईपासून ते 5 वर्षांच्या मुलीपर्यंत प्रत्येक स्तरातील स्त्रियांचे प्रश्न दुर्दैवाने काळानुसार बळकट होत आहे. स्वच्छतागृहे 54 कुटुंबांमध्ये मिळून तीनच आहेत. बांधकाम जुने असल्याने भिंती, कठडे तकलादू झाले आहेत. वायर्स लोंबकळत असल्याने सतत शॉर्टसर्किट व्हायची भीती आहे.

शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू जवळ असल्याने बांधकामाला मर्यादा आहेत. त्यामुळे आपला वाडा कधी ना कधी सुरक्षित होईल ही प्रतिक्षा करण्याशिवाय त्यांच्या हातात काहीही नाही. त्यानंतर आमची पाऊले निघाली सदाशिव-नारायण पेठेकडे.. ज्यांचे मत जाणून घेतल्याशिवाय पुण्याचे मत जाणून घेतले असे होत नाही. एकीकडे स्थानिक तर दुसरीकडे पुण्याच्या कवेतला महाराष्ट्र. स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने राज्यातून अनेक विद्यार्थी पुण्यात आले. त्यानिमित्ताने इथल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. आणि यांचेही पुण्याच्या नेतृत्त्वाकडून काही अपेक्षा आहेत.

सुटसुटीत असलेल्या पेठांना अनेक प्रश्नांनी ग्रासले आहे. वाहतूक कोंडी, नियमित पाणी अशा अनेक प्रश्नांमुळे येथील रहिवासी त्रस्त आहेत. कितीही म्हणले तरी या कवेतल्या महाराष्ट्राचा ताण येतच आहे. त्यामुळे संतुलन करण्याची गरज या भागाला जास्त आहे. त्यानंतर आम्ही वळालो मंडईकडे.. वाट काढत.. अंगावरील सोनं सांभाळत इथे येणाऱ्या महिला अजूनही सुरक्षित वाट शोधत आहेत. तसेच व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहेच. तसेच मंंडई हे पुण्याचे राजकीय विद्यापीठ मानले जाते.. यातून अनेक विद्यार्थी गेले.. पण त्यांनीही मंडईकडे पाठच फिरवली.. त्यामुळे सरकार कोणतेही आले तरी मूळ प्रश्नांना घेऊन पुणेकर खऱ्या विकासाची वाट बघत आहेत. त्यामुळे 2024 पर्यंत खऱ्या अर्थाने पुणे चकचकीत आणि स्मार्ट झालेले असेल एवढीच माफक अपेक्षा आहे.

इतर ब्लॉग्स