"इलेक्‍शन इज हिअर'...पुण्यात इतिहास घडवूयात! 

संभाजी पाटील @pambhajisakal
Tuesday, 23 April 2019

सध्या युवा वर्गात हिट असणारी "गेम ऑफ थ्रोन्स' ही बेब सिरीज आता शेवटच्या टप्प्याकडे येऊन पोहचलीय, ती लोकसभा 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसारखीच. सात राजघराणी आणि त्यांची राजगादीवर बसण्यासाठी सुरु असणारी धडपड, त्यासाठी सुरू असणार आपआपसातील राजकारण सध्याच "यूथ' जितक्‍या गांभीर्याने घेतेय, त्याच गांभीर्याने देशाच्या राजकारणाचाही विचार करतील असं समजायला हरकत नाही. "विंटर इज कमिंग' पासून विंटर इज हिअर' अशी आठ वर्षांची स्थित्यंतर अनुभवलेल्या प्रत्येक नवमतदारासाठी आता हे वर्ष "विटंर' सोबत "इलेक्‍शन इज हिअर'असंच आहे.

सध्या युवा वर्गात हिट असणारी "गेम ऑफ थ्रोन्स' ही बेब सिरीज आता शेवटच्या टप्प्याकडे येऊन पोहचलीय, ती लोकसभा 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसारखीच. सात राजघराणी आणि त्यांची राजगादीवर बसण्यासाठी सुरु असणारी धडपड, त्यासाठी सुरू असणार आपआपसातील राजकारण सध्याच "यूथ' जितक्‍या गांभीर्याने घेतेय, त्याच गांभीर्याने देशाच्या राजकारणाचाही विचार करतील असं समजायला हरकत नाही. "विंटर इज कमिंग' पासून विंटर इज हिअर' अशी आठ वर्षांची स्थित्यंतर अनुभवलेल्या प्रत्येक नवमतदारासाठी आता हे वर्ष "विटंर' सोबत "इलेक्‍शन इज हिअर'असंच आहे. 2014 च्या तुलनेत तीन लाखांनी वाढलेली युवा मतदारांची टक्केवारी यंदाच्या निवडणुकांचं वेगळेपण ठरतीये. त्यामुळे पुण्याच्या मतदानाचा टक्का वाढविण्याची जबाबदारी या नवमतदारांचीच आहे. 

पुणेकरांनी ठरवले तर मतदानाचा टक्का 62 टक्‍क्‍यांवर जाऊ शकतो, हा इतिहास आहे. मात्र, कधी राजकारणाविषयीची घृणा, कधी उदासीनता, तर कधी मतदान प्रक्रियेतील दोष यामुळे मतदानाचा टक्का घसरतो. आधुनिकेतचा कोणताही स्पर्श न झालेली राज्यातील अशी अनेक मतदान केंद्रे आहेत, जिथे मतदान यंत्रेही डोक्‍यावर घेऊन जावी लागतात. पण मतदान केल्याने आपल्या आयुष्यात बदल घडेल या आशेने हे लोक मतदान करतात. मग शहरी भागात हे प्रमाण कमी का? पुणेकरांनी यंदा मतदानाला बाहेर पडून शहरी मतदारांवर होणारे आरोप खोडून काढावेत, अशी अपेक्षा आहे. 

निवडणूक आली की आपण मतदार यादीत नाव आहे काय, याची चाचपणी करतो. अनेकांचे पत्ते बदलतात, स्थलांतर होते पण एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार याद्या अपडेट करण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते. गेल्या सहा महिन्यात पुण्यात 50 हजार 130 मतदारांनी नव्याने नाव नोंदणी केली आहे. हा आकडा खरोखरच उत्साह वाढविणारी आहे. प्रश्‍न आहे तो प्रत्यक्ष मतदान करण्याचा. पुण्यातील "प्राब' या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील 707 मतदानकेंद्रांवर 62 टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतदानाची नोंद झाली. पुणे मतदारसंघातील 191 मतदान केंद्रांचा त्यात समावेश आहे. मतदार यादीतील दोष, नावांचा घोळ यांमुळे पाच ते अठरा टक्के लोक मतदानापासून वंचित राहतात. पण मतदानाची टक्का घसरविणारी इतर कारणे मात्र मतदारांच्या उदासिनतेकडे झुकणारीच आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत अनेक केंद्रांवर 70 ते 90 टक्‍क्‍यांच्या आसपास मतदान होते. लोकसभा निवडणूक तर देशाचे भविष्य घडविणारी, इतर कोणत्याही निवडणुकीपेक्षा अधिक परिणामकारक असते. अशावेळी मतदानापासून दूर राहणे महागात पडणारे ठरेल. 
पुण्यात 2014 च्या निवडणुकीत 54.24 टक्के मतदान झाले होते. यात सर्वात जास्त मतदारसंख्या (4.44 लाख) असणाऱ्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात 49 टक्के मतदान झाले होते. पुणे कॅन्टोंमेंट मध्ये हे प्रमाण 51 टक्के होते. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. 

"सकाळ'च्यावतीने मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी I Will Vote ही मोहीम राबविण्यात आली. त्यात नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी पुण्यात एक लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. खरी जबाबदारी या युवा मतदारांची आहे. हे युवा मतदार मतदानासाठी बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या कुटुंबियांनाही सहभागी करून घेतले तरी पुण्याची टक्केवारी झपाट्याने वाढेल. पुण्यात 1989 मध्ये 62.64 टक्के मतदान झाले होते. त्यावेळीही कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत झाली होती. मात्र त्यानंतर हा टक्का घसरत गेला. 2009 मध्ये तो 40 टक्‍क्‍यांवर खाली आला. आताच पुणे नवमतदारांचे आहे. आधुनिकतेची आस असणारे शहर कोणाच्या हाती द्यायचे याचा निर्णय घेण्यासाठी मतदान करणे आवश्‍यक आहे. मग पडताय ना बाहेर!

इतर ब्लॉग्स