फेक न्यूजच्या 'ट्रॅप'मध्ये राहुल गांधीदेखील... 

अभिषेक भोसले
शुक्रवार, 17 मे 2019

फेक न्यूज, चुकीची माहिती या भाजपने मागच्या पाच वर्षातल्या सत्तेत या देशाला दिलेल्या भेटी आहेत. मी फेक न्यूज, चुकीची माहिती यांचा अभ्यास करत असल्यानं जे जाणवत होतं, जे घडेल असं वाटत होतं ते आज घडलं...

फेक न्यूज, चुकीची माहिती या भाजपने मागच्या पाच वर्षातल्या सत्तेत या देशाला दिलेल्या भेटी आहेत. मी फेक न्यूज, चुकीची माहिती यांचा अभ्यास करत असल्यानं जे जाणवत होतं, जे घडेल असं वाटत होतं ते आज घडलं. 

खोटी माहिती आणि खोट्या बातम्या पसरविणाऱ्या भाजप आणि विशेषतः मोदी यांना शह देण्याच्या राजकारणात विरोधी पक्षांनी खोट्या बातम्या आणि माहिती पसरविण्याचं मॉडेल आत्मसातच केलं नाही तर त्यांचे बडे बडे नेते या मॉडेलचे वाहक बनत आहेत...

यावेळी फेक न्यूज मॉडेलचे खांदेकरी ठरलेत खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी. राहुल गांधींनी काल म्हणजे 15 मे ला एक ट्विट केलं होतं, त्यात इंग्रजी शब्दकोशात 'मोदीलाय' या नवीन शब्दाची भर पडल्याचं  लिहिलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो देखील जोडला होता. त्यात या शब्दाचा अर्थ होता. या शब्दाचा स्क्रिनशॉट ज्या संकेतस्थळावरचा आहे, त्या संकेतस्थळाचा लोगो ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या संकेतस्थळाशी साधर्म्य साधणारा होता.

त्यानंतर काही तासांतच ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून राहुल गांधीनीं शेअर केलेला फोटो/ स्क्रीनशॉट फेक आहे हे स्पष्ट करताना असा कोणताही शब्द त्यांच्या शब्दकोशात नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर हे लिखाण करेपर्यंत तरी राहुल गांधींच्या ट्विटरवरून हे ट्विट हटविण्यात आलं नव्हतं. तसंच कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या