तोंडाळ नेते आणि भाजप

 शिवराम गोपाळ वैद्य
Saturday, 18 May 2019

महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्तीचे प्रमाणपत्र देऊन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी, तोंडाळपणा आणि भाजप नेते यांचे "सख्खे" नाते पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या देशामध्ये आपल्याला जेवढे कळत आहे तेवढे अन्य कोणालाही कळत नाही असा गोड (गैर)समज असलेल्या नेत्यांची मांदियाळी, हे भाजपचे वैशिष्टय होते.

वाचाळपणाबरोबरच अहंपणा, दुराग्रहीपणा, हट्टीपणा, एककल्लीपणा आणि आततायीपणा अशी वैशिष्ट्ये असलेल्या अनेक व्यक्ती भाजपमध्ये तळ ठोकून होत्या. किंबहूना अशा अनेक विसंवादी पात्रांमुळेच भाजप आतापर्यंत सत्तेपासून दूर राहिलेला होता. देशात आत्तापर्यंत आलेली काँग्रेसेतर सरकारें अपवादानेच आपला कार्यकाळ पुरा करू शकली. विविध पदांवर असलेल्या भाजपच्या नेत्यांनी आपल्या तोंडाळपणामुळे इतिहासामध्ये अशा अनेक सरकारांच्या नरडीला नख लावले आहे.

बरें, आपण काय बोलतो आहोत, कुणाबद्दल बोलतो आहोत, कुठे-कधी बोलत आहोत, कोणासमोर बोलतो आहोत, याचा परिणाम काय होऊ शकतो, अशा कोणत्याही जुलमी बंधनांचा विचार न करता, भाजपचे नेते, तोंडातून पानतंबाखूची पिचकारी मारावी तसे, अमर्याद बोलत (की थुंकत?) असतात. अमित शहा पक्षाध्यक्ष आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या वाचाळवीरांच्या जीभेला थोडासा लगाम बसला आहे असे दिसत होते तोवर, प्रज्ञासिंह ठाकूर यांनी विरोधकांच्या हातात एक नवीन कोलीत दिले आहे. सवयीचे गुलाम !

इतर ब्लॉग्स