सोशलमिडीया...शॉपिंगचे नवे डेस्टिनेशन

वृंदा चांदोरकर
सोमवार, 12 डिसेंबर 2016

आजकाल ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. एकतर सोपा पर्याय आणि घरपोच मिळत असलेली सेवा यामुळे नोकरदार मंडळींचा ऑनलाईन खरेदी हा आवडता पर्याय झाला आहे. यामध्ये महिला देखील आता मागे नाहीत. यात कपडे, ज्वेलरी पासून ते ग्रोसरी पर्यंत सर्व खरेदी ऑनलाईन करण्याकडे कल वाढताना आपल्याला दिसतो. ऑनलाईन खरेदीच्या ईकॉमर्स संकेतस्थळांबरोबरच आता सोशल मिडियावर देखील हे पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात फेसबुक आणि ईन्स्टाग्रामने महत्त्वाचा वाटा उचचला आहे.
देशभरातील उद्योजग आणि ऑनलाईन ग्राहक यामुळे जोडले तर गेलेच परंतु, गृहउद्योगांनाही मोठी चालना मिळाली आहे. 

आजकाल ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. एकतर सोपा पर्याय आणि घरपोच मिळत असलेली सेवा यामुळे नोकरदार मंडळींचा ऑनलाईन खरेदी हा आवडता पर्याय झाला आहे. यामध्ये महिला देखील आता मागे नाहीत. यात कपडे, ज्वेलरी पासून ते ग्रोसरी पर्यंत सर्व खरेदी ऑनलाईन करण्याकडे कल वाढताना आपल्याला दिसतो. ऑनलाईन खरेदीच्या ईकॉमर्स संकेतस्थळांबरोबरच आता सोशल मिडियावर देखील हे पर्याय उपलब्ध झाले आहेत. यात फेसबुक आणि ईन्स्टाग्रामने महत्त्वाचा वाटा उचचला आहे.
देशभरातील उद्योजग आणि ऑनलाईन ग्राहक यामुळे जोडले तर गेलेच परंतु, गृहउद्योगांनाही मोठी चालना मिळाली आहे. 

फेसबुक पेजेस
ऑनलाईन खरेदी करण्याऱ्या नोकरदार महिला आणि लहानमोठे उद्योग करणाऱ्या गृहिणी यांच्यातला फेसबुक हा उत्तम दुवा झाला आहे. 
 
स्वत: तयार केलेल्या वस्तू विकणाऱ्या महिलांसाठी फेसबुक पेज हा चागला पर्याय आहे. यामुळे महिला गृहउद्योजकांना प्रोत्साहन तर मिळालेच आहे, शिवाय फेसबुक पेजची सुविधा मोफत असल्याने यात कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज नाही. त्यामुळे घरची जबाबदारी सांभाळताना गृहिणींना फेसबुकच्या माध्यमातून अशा प्रकारचे गृहउद्योग चालविणे सोपे झाले आहे. सध्या हॅण्डमेड उत्पादनांची चांगलीच क्रेझ असल्याने या छोट्या उद्योगांना चांगला प्रतिसादही मिळत आहे.

नोकरदार आणि ऑनलाईन खरेदी करणाऱ्या महिलांना घरगुती वस्तू सहज उपलब्ध होण्यासाठी फेसबुक पेजची चांगलीच मदत होत आहे. सोशल मिडियावरील शॉपिंगमध्ये नामांकित ब्रॅण्डच्या वस्तूंबरोबरच दर्जेदार हॅण्डमेड वस्तूंचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. या वस्तूंमध्ये सौंदर्य प्रसाधने, ऍक्सेसरीज, चपला, परफ्यूम्स, होम डेकोरच्या वस्तूंपासून घरगुती बनविलेल्या पदार्थांपर्यत सर्व गोष्टी फेसबुक-पेजवर खरेदी करणं सहज शक्य आहे. यासाठी सोपा मार्ग म्हणजे तुमच्या आवडीच्या वस्तूंचे किंवा ब्रॅण्डचे फेसबुक-पेज तुम्ही लाईक करुन ठेवा. त्यानंतर तुम्हाला त्या वस्तूंची माहिती किंवा अपडेट्स तुमच्या फेसबुक वॉलवर सहज उपलब्ध होतात. अशा एखाद्या उत्पादनाची 'फेसबुक पोस्ट' तुम्हाला दिसल्यास त्याबरोबर त्याची इतर माहिती देखील असते. उदा. वस्तूची किंमत, ती खरेदी करण्यासाठी पेज ओनरचा फोन नंबर किंवा त्यांचे संकेतस्थळ... अशा माहितीच्या आधारे संबंधीत पेज ओनरला संपर्क करुन या वस्तू खरेदी करता येऊ शकतात.   

उदा : 
Kalakari - https://www.facebook.com/thekalakari/

Tejadnya
https://www.facebook.com/Tejadnya/?fref=ts

Aroma
- https://www.facebook.com/AromaEss/

फेसबुक ग्रुप
फेसबुक ग्रुप हा आणखी एक चांगला पर्याय आहे. आपल्या आवडीच्या विषयाप्रमाणे विविध ग्रुप्स् सर्च करता येतात. हे ग्रुप्स अॅड केल्यानंतर त्यात नुसती खरेदीच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा, हॅंडमेड वस्तूंच्या प्रदर्शनांची माहिती, काही घरच्या घरी वस्तू तयार करण्यासाठीच्या टिप्स अशी विविध माहिती देखील मिळते. तसेच आपल्याला एखादी कस्टमाईझ्ड वस्तू हवी असल्यास तशी मागणी आपण ग्रुपवर करु शकतो. त्याबरोबर आपल्या फोन नंबर किंवा इमेल दिल्यास ग्रुपमधील मेंम्बर्स स्वत: आपल्याला संपर्क करतात. त्यामुळे हवी तशी वस्तू तीचा दर्जा तपासून खरेदी करणेही अगदी सोपे होते. 

उदा :
fevicryl hobby ideas
- https://www.facebook.com/groups/fevicrylhobbyideas/

Kids Food Recipes
- https://www.facebook.com/groups/KidsFoodRecipes/?ref=group_browse_new

OrganizingIdeas
- https://www.facebook.com/groups/OrganizingIdeas/  

इन्स्टाग्राम
फेसबुक प्रमाणे सध्या इन्स्टाग्रामचीही क्रेझ आहे. इन्स्टाग्राम हे एक 'पिक्टोरिअल सोशल अॅप' आहे. वेगवेगळ्या ब्रॅंण्ड्सची किंवा महिला गृहउद्याजकांची अकाउंट्स इन्स्टाग्रामवर आहेत. यामध्ये ( # ) हॅशटॅगच्या मदतीने आपल्याला हवे ते प्रॉडक्ट किंवा एखादे अकाऊंट सर्च करता येते उदा. #claybottle #jewelry #earrings.  त्यानंतर इन्स्टाग्राम पोस्ट बरोबर उपलब्ध असलेल्या माहितीतून आपल्याला अकाऊंट ओनरला संपर्क करता येतो. 

सोशल मिडीयावर खरेदी करताना बऱ्याचदा आपल्या पेज ओनरचा किंवा ग्रुप मेंबरचा संपर्क मिळाल्यानंतर वस्तू खरेदीकरण्यापूर्वी आपल्याला पैसे भरणे आवश्यक असते. अशा वेळेला आपल्याला ओनरची खात्री वाटत नसल्यास किंवा वस्तूचा फोटो आणि प्रत्यक्ष वस्तू यांच्या दर्जाबाबत शंका असल्यास PayPal (https://goo.gl/SuOfgf) किंवा paytm(http://goo.gl/Lx1R5D) यासारख्या संकेतस्थळांची मदत घेता येते. ही संकेस्थळे ग्रहक आणि विक्रेता यांमधील दुवा म्हणून काम करतात. त्यामुळे या संकेतस्थळांद्वारे ऑनलाईन पेमेंट करणे सुरक्षीत असते. तसेच पैसे भरुनही वस्तू मिळाली नाही अथवा दर्जा चांगला नसल्यास आपल्याला हे पेमेंट थांबविणे अथवा रद्द करणे सोपे होते. त्यामुळे आपली फसवणुक होऊ नये यासाठी मदत होते.

 

 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या