अध्यात्म आणि मानसिक आरोग्य...निरोगी आरोग्याची गुरूकिल्ली!

चिन्मयी पाटील
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

सहज, सुलभ, निरोगी आयुष्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करताना दिसतात परंतु त्याचे संतुलन कसे करावे याबबत योग्य ज्ञान नसल्याने बऱ्याचदा अपयशाचे दरवाजे उघडतात. असे का घडते याबाबत मार्गदर्शन व्हायला हवे कारण निरोगी आयुष्याकडे खऱ्या अर्थाने पाहणे गरजेचे आहे. निरोगी आरोग्यासाठी महत्तवाच्या असणाऱ्या अध्यात्म आणि मानसिक आरोग्य या दोन गोष्टीं आपण मुख्यत: पाहणार आहोत.

सहज, सुलभ, निरोगी आयुष्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करताना दिसतात परंतु त्याचे संतुलन कसे करावे याबबत योग्य ज्ञान नसल्याने बऱ्याचदा अपयशाचे दरवाजे उघडतात. असे का घडते याबाबत मार्गदर्शन व्हायला हवे कारण निरोगी आयुष्याकडे खऱ्या अर्थाने पाहणे गरजेचे आहे. निरोगी आरोग्यासाठी महत्तवाच्या असणाऱ्या अध्यात्म आणि मानसिक आरोग्य या दोन गोष्टीं आपण मुख्यत: पाहणार आहोत.

अध्यात्म म्हटला तर प्रत्येकानुसार वेगवेगळे अर्थ, समज, गैरसमज पाहायला मिळतात. मात्र, निरोगी आरोग्यासाठी अध्यात्म याबाबत फारसे कुणाला ज्ञात नाही. याची गरज पहिल्यांदा जाणून घेणे गरजेचे आहे. यामध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांना प्राधान्य आणि अर्थपूर्ण, अद्वितीय आणि खोलवरचा वयक्तीक अनुभव या गोष्टींचा मुख्यत: समावेश होतो आणि या गोष्टींमधूनच अध्यात्माची निरोगी आणि सुदृढ आरोग्यासोबत सांगड घातली जाते.

अध्यात्म म्हणजे अधि – आत्म म्हणजे स्वतकडे पाहणे, स्वताकडे पाहिल्याने आत्मपरिक्षणाची सवय लागते. त्यातूनच आपल्या जीवनाचा खोलवर दडलेला अर्थ काय याचा विचार सुरू होऊन एक पुर्णत्वाची आस निर्माण होते. अध्यात्म हे लोकांना जीवनाचा अर्थ सांगण्यासाठी, समजावण्यासाठी मदत करते. या साऱ्या गोष्टींचा सकारात्मक प्रभाव मानसिक आणि आरोग्यावर नक्कीच दिसून येतो. ज्यामध्ये व्यक्तीमत्व, सावधपणा आणि भोवतालचे ऐक्य असे काही उत्तमभूत फायदे पाहायला मिळतात. 

अध्यात्मला निरोगी आयुष्याशी जोडणी करताना त्याची परिभाषा समजून घेणे महत्तवाचे आहे कारण वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये लोकांसाठी त्याचे अर्थ भिन्न भिन्न आहेत. शतकानुशतक वातावरण आणि अध्यात्मातील अलीकडील अभिव्यक्त अधिकच भिन्नपणे विखूरले गेले आहेत. अध्यात्माची परिभाषा समजून घेण्यासाठी काही गोष्टी समजून घेणे महत्तवाचे आहेत. जसे. संपूर्णतेचा शोध, आशा किंवा सुसंवादाचा शोध यासारख्या अनेक गोष्टी शब्दसंग्रहाच्या श्रेणीमधील प्रतिबिंबात अध्यात्माचे वर्णन करत परिभाषा समजावून सांगतात.
अध्यात्मात धार्मिक परंपरा देखील पाहायला मिळते. प्रत्येक धर्माचा स्वतंत्र समुदाय आधारित उपासना, श्रद्धा पवित्र ग्रंथ आणि परंपरा आहेत परंतु, अध्यात्म कोणत्याही विशिष्ठ धर्मनिष्ठ परंपरेला जोडलेले नाही. प्रत्येकाचा अध्यात्माचा स्वतचा वेगळा अनुभव असतो पण अध्यात्मात धर्माचे स्थान कायमच जोडलेले असल्याचे पाहायला मिळते. ही संलग्नता जीवनात अत्यंत महत्तवाची असते.
प्रत्येकाच्याच आयुष्यात कमी – अधिक प्रमाणात अध्यात्म पाहायला मिळते. अध्यात्मामुळे जीवनाच्या उद्दीष्टाचे खोल अर्थ समजतात. अस्वस्थता, मानसिक ताण, शारीरिक आणि मानसिक आजार, तोटा, शोक आणि मृत्यूच्या वेळी अध्यात्म आपली कामगिरी बजावतो. अध्यात्म हे सगळ्यावर रामबाण अशी जडीबुटी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हे जीवनात मार्गदर्शक म्हणून काम करते, जिथे चांगले आणि वाईट आपल्याला शिकण्यास, विकसित करण्यात आणि प्रोढ होण्यास मदत करतात.

अध्यात्माबरोबर मानसिक आरोग्याचे पैलू समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. धर्म आणि अध्यात्म याचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो धर्म आणि अध्यात्म हे प्रामुख्याने शांतता, उद्देश आणि क्षमाची रूजवण करत तणाव सहन आणि कमी करण्यास मदत होते. आध्यात्मिक आरोग्यात सुधारणा केल्यास आजार बरे होत नाही, परंतु नैराश्य आणि चिंता हे मात्र कमी करू शकतो आणि तणावाच्या विरोधात उभे राहण्याची ताकद मिळते.

मानसिक आरोग्य म्हणजे आपण कसे विचार करतो, जाणतो आणि वागतो. तणाव कसा हाताळायचा,परस्पर हितसंबंध आणि निवड म्हणजे मानसिक आरोग्य होय. मुळात स्वस्थ राहण्याविषयी लोकांचे अनेक फंडे असतात. परंतु मार्ग चुकल्याने अनेकजण आपलं शरीरस्वास्थ गमावातात. म्हणूनच स्वस्थ राहणे म्हणजे काय हे समजून घेणे महत्तवाचे आहे कारण सरतेशेवटी सारं यातच लपलेले आहे. स्वस्थ राहणे म्हणजे वजन कमी करणे नव्हे किंवा आहार पुरकतेत कमी करून चांगल्या शरीरस्वास्थ्यासाठी आशा बाळगणे नव्हे. स्वस्थ राहणे म्हणजे आपल्या आत्म्याची पुनर्रप्राप्ती ज्यात आपल्याला आध्यात्मिकरीत्या, शारीरिक आणि मानसिकरीत्या बदल हवा असतो. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा आध्यात्मिक आणि मानसिक आरोग्याचे समन्वय साधला जातो.

इतर ब्लॉग्स