कार्ड पेमेंटचा सोपा मार्ग!

card payment easy way
card payment easy way

अनेक पाश्‍चिमात्य देशांत सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी क्रेडिट आणि डेबिट कार्डांचा वापर अगदी सर्रास होतो. आता आपल्याकडेसुद्धा ही परंपरा रुजायला लागली आहे. सरकारने या प्रकारच्या व्यवहारांना चालना देण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे आपणही आपल्या कपाटांमध्ये सरकवून टाकलेली कार्डे बाहेर काढून वापरली पाहिजेत. क्रेडिट कार्ड हे बॅंकेने आपल्याला काही दिवसांच्या मुदतीसाठी दिलेले जणू एक कर्जच असते.

डेबिट कार्ड हे आपल्या बॅंक खात्याशी जोडलेले असते. दोन्हींचा वापर आपण आर्थिक व्यवहार करण्यासाठी सहजपणे करू शकतो. या कार्डांवरील माहिती आपण गोपनीय तर ठेवलीच पाहिजे; पण आणखी जास्त सुरक्षेसाठी या कार्डांबरोबरचा पिन क्रमांक तर आपण कोणालाच सांगता कामा नये. हा पिन आपण स्वत: प्रत्येक ठिकाणी व्यवहारानंतर "टाइप' केला पाहिजे. तसेच आपल्याला कोणाचाही फोन आला आणि आपल्या कार्डांविषयीची माहिती जर विचारली तर आपण ती अजिबात पुरवता कामा नये. सर्वसामान्यपणे डेबिट कार्डांपेक्षा क्रेडिट कार्ड वापरणे जास्त सुरक्षित असते; कारण त्यात काही घोटाळे झाले तर त्यांचा तपास करण्याची मुख्य जबाबदारी बॅंकेवर येते.

आपल्याकडे क्रेडिट वा डेबिट कार्ड असले, की आपण निर्धास्तपणे बहुतेक सर्व शहरांत आरामात "कॅशलेस' व्यवहार करू शकतो. तसेच यातील धोके कमी करण्यासाठी किती रकमेपर्यंत या कार्डांनी व्यवहार करता येतील, यावर बॅंकेच्या मदतीनं निर्बंधसुद्धा घालू शकतो. त्यातही आपण भारताचे "रुपे' कार्ड वापरले तर आपल्याला कार्डांच्या वापरावरचा सरचार्ज एकदम कमी बसतो. तुलनेने मास्टर कार्ड किंवा व्हिसा कार्डांमध्ये हा सरचार्ज जास्त असतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com