स्मार्ट फोनविना "कॅशलेस' शक्‍य! 

अतुल कहाते
गुरुवार, 5 जानेवारी 2017

"कॅशलेस' व्यवहार करण्यासाठी आपल्याकडे इंटरनेटची सुविधा असायलाच हवी; तसेच आपल्याकडे स्मार्ट फोनही हवा, हे दोन्ही गैरसमज आहेत. या सुविधा नसलेले लोकही अगदी सहजपणे "कॅशलेस' व्यवहार करू शकतात. आपल्या देशात बहुसंख्य लोकांकडे अजूनही साधे म्हणजेच "फीचर फोन' असल्यामुळे ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. तसेच इंटरनेटची सुविधासुद्धा ग्रामीण भागांमध्ये सहजासहजी उपलब्ध होत नसल्यामुळे इंटरनेटविना "कॅशलेस' व्यवहार करता येणे अत्यंत गरजेचे आहे.

यासाठी दोन महत्त्वाचे पर्याय आहेत. पहिल्या पर्यायाला "यूएसएसडी' म्हणतात. यामधील तांत्रिकता दूर ठेवत आपण याचा सोपा अर्थ समजून घेऊ. साध्या फोनवरून आपण ठराविक प्रकारचा कोड डायल करायचा, त्यानंतर कोणाला पैसे पाठवायचे आहेत त्याचा नंबर टाइप करून रक्कम आणि पिन या गोष्टी टाइप करायच्या, अशी यातील मूळ संकल्पना आहे. ही प्रक्रिया थोडी किचकट असल्यामुळे लोक तिचा वापर करताना चुका करतात किंवा बिचकतात. हे ओळखून पेटीएम या ई-वॉलेट कंपनीने आपली सुविधा साध्या फोनवरून वापरण्याची सोय करून दिली आहे. एका ठराविक "टोल फ्री' क्रमांकाला फोन करून आपण अगदी सहजपणे दुसऱ्या पेटीएम ग्राहकाला पैसे पाठवू शकता. सुरक्षिततेसाठी या व्यवहारात एक चार आकडी पिन वापरणे आवश्‍यक असते. यामुळे दुसऱ्याच्या फोनवरून हा व्यवहार करणे भामट्याला शक्‍य होत नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकत्याच जाहीर केलेल्या "भीम' या ऍपमध्येसुद्धा अशीच सोय आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे "भीम' ही भारत सरकारतर्फे बॅंकांना जोडलेली सुविधा असल्यामुळे तिची विश्वासार्हता जास्त असेल. येत्या काही दिवसांत त्याविषयी आपल्याला आणखी बरेच काही ऐकायला मिळणार आहे. 
 
इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या