संदीप अन्‌ रूपालीला कसा पावला श्रीगणेशा

सुस्मिता वडतिले
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

थरथरत्या हाताने, छाती धडधडत "तिच्या'वरील प्रेमाची कबुली द्यायची आणि "तिने' लाजून हो म्हणत ते स्वीकारलं की, जो आनंद वाटतो तो स्वर्गात न मावणारा असतो. आज व्हॅलेंटाइन डे मधील दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. त्यानिमित्ताने संदीप भांगे आणि रूपाली सुरोशी यांची ही लव्हस्टोरी पाहूया... 

थरथरत्या हाताने, छाती धडधडत "तिच्या'वरील प्रेमाची कबुली द्यायची आणि "तिने' लाजून हो म्हणत ते स्वीकारलं की, जो आनंद वाटतो तो स्वर्गात न मावणारा असतो. आज व्हॅलेंटाइन डे मधील दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. त्यानिमित्ताने संदीप भांगे आणि रूपाली सुरोशी यांची ही लव्हस्टोरी पाहूया... 
प्रेम विश्‍व हे आनंददायी असते. प्रेम कधी, केव्हा, कुठे नी कसे होते कोणीही सांगू शकत नाही. प्रेम म्हणजे तिच्या ओठांवरील हास्य आणि त्या हास्याची ओळख म्हणजे त्याचं हास्य. संदीप भांगे आणि रूपाली सुरोशी यांची ही लव्हस्टोरी, अशीच काहीशी. रूपाली ही संदीपच्या मामाची मुलगी. वडील सरकारी नोकरी असलेल्या संदीपचे दहावीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील खेड्यात झाले. वडील गेल्यानंतर तो गावी राहायला गेला. रूपाली संदीपसोबत चौथीपर्यंत एकत्र होती. सुरवातीला ते दोघे बोलत नव्हते. संदीपच्या मामाकडे गणपती असतात. या गणपतीच्या दिवसात त्यांच्या प्रेमाची सुरवात झाली. त्यादिवसात कामानिमित्त जागरण करताना तिचं सर्वांसाठी चहा ठेवणे, पाणी आणून देणे तसेच वारंवार विचारपूस करणे, हे सारं त्याला खूप आवडत होते. यातूनच 2012 मध्ये दोघेजण प्रेमात पडले. 

हेही वाचा : गोष्ट संदीप आणि अश्‍विनी यांच्या लग्नापूर्वीची 

मामाची मुलगी म्हणून सर्व तयार होतील असे त्याला वाटले. मात्र, तो कमवत नसल्यामुळे अनेक समस्या समोर आल्या. एक वेळ अशी आली की, घरच्यांनी तिचं लग्न जमवायला घेतलं. टिळा लावण्याचा कार्यक्रमही झाला. त्यावेळेस तो पूर्णपणे तुटून गेला. मात्र, दैव आणि त्याच्या घरच्यांनी आणि मित्र तुषार माळी यांनी साथ दिली. तिचे जमलेले लग्न मोडले. प्रेमातील प्रामाणिकपणा त्यांच्या दोघांसोबत होता. कुटुंबातील साऱ्यांनी आनंदाने दोघांचे प्रेम मान्य केले. संदीपच्या आईने मामाकडे लग्नाची बोलणी केली. एका वर्षानंतर 2014 ला दोघांचे लग्न झाले. संदीपला वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणार होती. त्यासाठी त्याची धडपड सुरू होती. शिक्षण, लग्न आणि नोकरी अशा सर्व आघाड्यांवर संदीप लढत होता. अखेर यश आले. आज रूपाली आणि संदीप सात वर्षे झाले एकत्र आहेत. सध्या सोलापुरात संदीप आणि रूपाली यांचा सुखाने संसार सुरू आहे.  

 

इतर ब्लॉग्स