सेंट पिटर्स बॅसिलिकामधून बाहेर पडणारा पांढरा धूर नेहेमीच अनपेक्षित बातमी सांगत असतो. अमेरिकन कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची म्हणून पोप लिओ चौदावे म्हणून निवड झाल्याने ही परंपरा कायम राहिली आहे.
नूतन पोप जगातील प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत, त्याबरोबरच ते पेरु या लॅटिन अमेरिकेतील देशाचेही नागरिक आहेत. पोप म्हणून व्हॅटिकन सिटी या जगातल्या सर्वात चिमुकल्या राष्ट्राचे ते आता राष्ट्रप्रमुख बनले आहेत. पोप हे पदसिद्ध रोमचे बिशपसुद्धा असतात.